Maharashtra Breaking News LIVE 27 September 2024 : मुंबई सिनेट निवडणुकीत युवासेनेने खात उघडलं, मयूर पांचाळ यांचा विजय

| Updated on: Sep 29, 2024 | 9:42 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 27 सप्टेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 27 September 2024 : मुंबई सिनेट निवडणुकीत युवासेनेने खात उघडलं, मयूर पांचाळ यांचा विजय
Follow us on

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक मंगळवारी 24 सप्टेंबर 2024 रोजी पार पडली होती. आज या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदवीधरकांच्या जागांकरिता एकूण 28 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाची युवासेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात थेट लढत होणार आहे. त्यामुळे ठाकरे की भाजप कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळत आहे. तसेच सध्या महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक नद्यांनी पूर आला आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Sep 2024 07:42 PM (IST)

    जुहूतल्या इस्कॉन टेम्पलमध्येही पोलिसांकडून मॉक ड्रील

    मुंबई : जुहूतल्या इस्कॉन टेम्पलमध्येही पोलिसांकडून मॉक ड्रील करण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव वेगवेगळ्या ठिकाणी मॉक ड्रिल घेण्यात आलं. पायधुनी परिसराबरोबरच जुहू इस्कॉन टेम्पलमध्येही मॉक ड्रिल घेण्यात आलं. नवरात्री तोंडावर असल्याने खबरदारी म्हणून अनेक भागात पोलिसांकडून तपासण्या केल्या जात आहे.

  • 27 Sep 2024 05:23 PM (IST)

    जळगावात सलग पाचव्या दिवशी परतीच्या पावसाची जोरदार बॅटिंग

    जळगाव जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी परतीच्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह प्रचंड मुसळधार पाऊस होतोय. सलग चार दिवसापासून जळगाव जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये पावसाने कहर केला आहे.


  • 27 Sep 2024 05:22 PM (IST)

    मनसे प्रमुख राज ठाकरे दोन दिवस अमरावतीच्या दौऱ्यावर

    आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे दोन दिवस अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्यादरम्यान गुजरातचे आरोग्य मंत्री ऋषिकेश पटेल यांनी राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. अमरावतीमधील हॉटेल ग्रँड मैफिल इनमध्ये ही भेट झाली. काही वेळापूर्वीच शिवसेना नेते मंत्री उदय सामंत यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतलीय.

  • 27 Sep 2024 04:52 PM (IST)

    मुसळधार पावसामुळे सिक्कीममध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन

    सिक्कीममध्ये गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात दरडी कोसळल्या आहेत. संकलंग पुलाचेही नुकसान झाल्याची माहिती आहे. हवामान खात्याने सिक्कीममध्ये पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

  • 27 Sep 2024 04:37 PM (IST)

    मनी लाँड्रिंग प्रकरणी तेलंगणाच्या मंत्र्यांच्या घरावर ईडीने छापा टाकला

    ईडीने तेलंगणाचे महसूल मंत्री पी. श्रीनिवास रेड्डी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात इतर काही लोकांशी संबंधित अनेक ठिकाणी छापे टाकले.

  • 27 Sep 2024 04:25 PM (IST)

    आतिशी-केजरीवाल यांच्या याचिकेवर आता 30 सप्टेंबरला सुनावणी

    मानहानीच्या खटल्यात उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली. दोन्ही नेत्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले होते, ज्यात त्यांनी मतदार यादीतून 30 लाख मतदारांची नावे वगळल्याचा आरोप केला होता.

  • 27 Sep 2024 04:10 PM (IST)

    काँग्रेसला बदनाम करण्याचा भाजपचा उद्देश, MUDA प्रकरणावर खर्गे म्हणाले

    काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, सिद्धरामय्या यांनी वैयक्तिकरित्या काही गुन्हा केला असेल तर ते जबाबदार आहेत, मात्र त्यांनी असा कोणताही गुन्हा केलेला नाही. काँग्रेस पक्षाची बदनामी करणे हा त्यांचा (भाजप) मुख्य उद्देश आहे, हे योग्य नाही, त्यांनी (सिद्धरामय्या) पदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

  • 27 Sep 2024 03:53 PM (IST)

    युवासेनेचे मयूर पांचाळ यांचा 5 हजार 350 मतांनी विजय

    मुंबई सिनेट निवडणुकीत युवासेनेने खात उघडलं आहे. ओबीसी प्रवर्गातून युवासेनेचे मयूर पांचाळ यांचा विजय झाला आहे. मयूर पांचाळ यांचा 5 हजार 350 मतांनी विजय झाला आहे. युवासेनेचा 10 पैकी 10 जागांवर विजय मिळवण्याचा मानस आहे.

  • 27 Sep 2024 03:32 PM (IST)

    ढोल-ताशांच्या गजरात 20 फुटांच्या पोस्टरची मिरवणूक

    कल्याणमध्ये धर्मवीर 2च्या पहिल्या शोला शिवसैनिकांचा जल्लोष पाहायला मिळाला आहे. ढोल-ताशांच्या गजरात 20 फुटांच्या पोस्टरची मिरवणूक काढण्यात आली. दुधाच्या अभिषेकाने धर्मवीरचा भव्य स्वागत सोहळा करण्यात आला. कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह शेकडो शिवसेना शिंदे गट कार्यकर्त्यांनी या स्वागत सोहळ्यात नाचत सहभाग घेतला.

  • 27 Sep 2024 03:29 PM (IST)

    आमदार शिंदे यांच्या अडचणी वाढणार असल्याचं चित्र

    माढ्यातून मोठी बातमी समोर आली आहे. माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात पुतणे धनराज शिंदे यांनी बंड केलं आहे. धनराज शिंदे आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं समजत आहे. त्यामुळे आमदार शिंदे यांच्या अडचणी वाढणार असल्याचं चित्र आहे.

  • 27 Sep 2024 01:59 PM (IST)

    अमित ठाकरे नाशिकमध्ये दाखल

    अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भात बैठक

  • 27 Sep 2024 01:37 PM (IST)

    अजित पवार यांचे मोठे भाष्य

    केंद्रात आमच्या विचाराचा सरकार आहे त्यामुळे राज्याच्या विकासाबाबत आम्ही तिथे भांडू शकतो. जर इथ विरोधकांचं सरकार आलं तर ते म्हणतील. केंद्र सरकार आमचं ऐकत नाही आम्ही काय करू, असे अजित पवार यांनी म्हटले

  • 27 Sep 2024 01:14 PM (IST)

    कोल्हापूरचे कार्यकर्ते मातोश्रीवर पोहोचले

    उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा होणार आहेत.विधानसभेच्या तयारीवर चर्चा होणार आहे. मातोश्रीवर कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विधानसभा च्या कार्यकर्त्यांची बैठक सुरू आहे.

     

  • 27 Sep 2024 01:07 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिर्डी दौरा रद्द

    डोळ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर डाॅक्टरांचा आराम करण्याचा सल्ला. पावसाळ्याचे दिवस असल्याने डाॅक्टरांचा सल्ला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडणार

  • 27 Sep 2024 12:51 PM (IST)

    शिवस्वराज्य यात्रेच्या सभास्थळावर मराठा समाजाचे कार्यकर्ते दाखल

    राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या “शिवस्वराज्य यात्रेच्या” सभास्थळावर मराठा समाजाचे कार्यकर्ते दाखल. मराठा आरक्षण मुद्द्यावर राष्ट्रवादी (SP) ने आपली भूमिका स्पष्ट करण्याबाबत विचारला जाब. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून सभास्थळावर जोरदार घोषणाबाजी. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार निलेश लंके यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घातला घेराव. सभास्थळाच्या मुख्य मंचावर जाऊन मराठा कार्यकर्त्यांनी विचारला जाब.

  • 27 Sep 2024 12:49 PM (IST)

    अक्षय शिंदे मृतदेह दफनविधी संदर्भात न्यायालयात होणार सुनावणी

    अक्षय शिंदेचा मृतदेह दफनविधीच्या जागेसंदर्भात एक वाजता मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी. अंबरनाथ नगरपरिषद परिसरात स्मशान भूमीमध्ये दफन करण्याची अक्षयच्या आई-वडिलांची होती मागणी. मात्र नगर परिषदेने अक्षयच्या कुटुंबियांचा अर्ज न स्वीकारल्याने उच्च न्यायालयात अर्ज केला असून यावर होणार सुनावणी

  • 27 Sep 2024 12:25 PM (IST)

    सकल कोळी समाजाच्या वतीने आमरण उपोषण

    सोलापुरात सकल कोळी समाजाच्या वतीने आमरण उपोषण सुरू. शिवसेना उपनेते शरद कोळी यांच्यासह शेकडो कोळी बांधव उपोषणात सहभागी. कोळी समाजाला कोणत्याही जाचक अटी न लावता महादेव, मल्हार, टोकरे, ढोर, कोळी समाजाला जातीचे दाखले देण्यासाठी आमरण उपोषण सुरू. मागील तीन दिवसापासून आमरण उपोषण सुरू असून 5 लोक उपोषणाला बसलेत

  • 27 Sep 2024 12:17 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या तोडफोडीचा प्रयत्न

    अज्ञात महिलेकडून देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाच्या तोडफोडीचा प्रयत्न. फडणवीसांच्या नावाची पाटी काढून फेकून दिली.

  • 27 Sep 2024 11:58 AM (IST)

    शिक्रापूर येथे निषेध सभा

    शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे तीन वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ शिक्रापूर ग्रामस्थांच्या वतीने निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्रापूर व परिसरातील हजारो नागरिक या निषेध सभेला उपस्थित राहिल्याचे दिसून आले यावेळी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी शिक्रापूर ग्रामस्थांच्या वतीने पोलीस प्रशासनाला करण्यात आली, पोलीसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

  • 27 Sep 2024 11:50 AM (IST)

    अंबादास दानवे यांची भाजपवर टीका

    मागील जसे सरकार आले. तेव्हापासून काम करत होते, तेव्हा काय हाल झाले ? गडकरी लीड कमी, दानवे पराभूत सर्व मंत्री पराभूत झाले. आमिष शहा इथ येऊन काही करू शकत नाही. तुमचं नेतृत्व कुचकामी म्हणून तुम्हाला यावं लागत असल्याची टीका त्यांनी भाजपवर केली.

  • 27 Sep 2024 11:40 AM (IST)

    राधाकृष्ण विखे पाटलांची विरोधकांवर टीका

    राधाकृष्ण विखे पाटली यांनी विरोधकांवर टीका केली आहे. टिका करणे हा विरोधकांचा धंदा आहे. ते लाडक्या बहिणीला विसरले होते. महाविकास आघाडीने अडीच वर्षे फक्त भ्रष्टाचार केला. आमच्या सारखी एकही योजना राज्यातील जनतेला देण्याचे त्यांना सुचले नाही. विरोधक आज फक्त टिका करताय, असा आरोप त्यांनी केला.

  • 27 Sep 2024 11:30 AM (IST)

    भगीरथ भालके यांची जन आशीर्वाद यात्रा मतदारसंघात

    भगीरथ भालके यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा आज चौदावा दिवस आहे. भालके यांच्या जन आशीर्वाद यात्रेने पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला. भगीरथ भालके पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते.

  • 27 Sep 2024 11:18 AM (IST)

    परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान

    परतीच्या पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. गेल्या वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस सलग दोन दिवस बरसल्याने पिकाचे नुकसान झाले. ऐन काढणीवर आलेल्या खरीप हंगामातील कापूस पिकाच्या मोठ्या नुकसान झाला आहे.

  • 27 Sep 2024 11:10 AM (IST)

    पुणे मेट्रोच्या उद्धघाटनासाठी मविआ आक्रमक

    आज मविआ पुणे मेट्रोच्या उद्धघाटनासाठी आक्रमक झाली. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धघाटन होणार होते. पण काल त्यांचा दौरा रद्द झाला.

  • 27 Sep 2024 11:00 AM (IST)

    केंद्राचे एक सदस्यी पथक राज्याच्या दौऱ्यावर

    नवीन लाल कांदा लागवड, जुना उन्हाळा कांदा आवकची माहिती घेण्यासाठी केंद्राचे एक सदस्यी पथक राज्याच्या दौऱ्यावर आले आहे. नाशिकच्या दौऱ्यावर असतांना लासलगाव बाजार समितीत बाजार समिती संचालक, शेतकरी प्रतिनिधी, कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांसोबत एक तास चर्चा केली.

  • 27 Sep 2024 10:50 AM (IST)

    ..तर असे सिनेमे काढून स्वत:चा डंका पिटवण्याची वेळ आली नसती- राऊत

    “आनंद दिघे हे शिवसेनेचे निष्ठावंत जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी होते. सर्वसामान्यांच्या मदतीसाठी ते सतत पुढे असायचे. दुर्दैवाने त्यांचा अकाली मृत्यू झाला आणि शिंदेपेंक्षा राजन विचारे किंवा इतर अनेक असे लोक होते, जे दिघे साहेबांच्या फार जवळ होते. त्यामुळे धर्मवीरावर काल्पनिक कथा रचून पडद्यावर सिनेमे आणण्यापेक्षा धर्मवीरांसारखं जर तुम्ही शिवसेनेच्या प्रती निष्ठा बाळगली असती तर तुम्हाला असे सिनेमे काढून स्वत:चा डंका पिटवण्याची वेळ आली नसती,”  अशी टीका संजय राऊतांनी केली.

  • 27 Sep 2024 10:40 AM (IST)

    धर्मवीरपेक्षा त्यांनी गुजरातच्या औरंगजेबवर सिनेमा काढला पाहिजे- संजय राऊत

    “आनंद दिघे काय होते हे सगळ्यांना माहीत आहे. त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नेण्याचा प्रयत्न होतोय. एक नवीन प्रतीक तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय. शिंदे यांच्यापेक्षा राजन विचारे दिघे साहेब यांच्या जवळचे होते. हे काय गोलमाल १, २, ३ सिनेमा काढत आहेत का? त्यांनी गुजरातच्या औरंगजेबवर सिनेमा काढला पाहिजे,” अशा शब्दांत संजय राऊतांनी टीका केली.

  • 27 Sep 2024 10:40 AM (IST)

    विद्यमान डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांचं निधन

    डोंबिवलीमधील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते आणि आरपीआय (आठवले गटाचे) विद्यमान डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांचं निधन झालं. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं असून दुपारी दोन वाजता मोठागाव ठाकुर्ली इथल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

  • 27 Sep 2024 10:30 AM (IST)

    नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ‘धर्मवीर 2’ या चित्रपटाच्या विशेष शोचं आयोजन

    नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ‘धर्मवीर 2’ या चित्रपटाच्या विशेष शोचं आयोजन करण्यात आलं आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासाठी या चित्रपटाच्या विशेष शोचं आयोजन करण्यात आलं आहे. नाशिकच्या विजय ममता सिनेमागृहात हा विशेष शो आयोजित करण्यात आला.

  • 27 Sep 2024 10:20 AM (IST)

    अजित पवार यांची जनसमान यात्रा आज कोल्हापूरच्या चंदगड विधानसभा मतदारसंघात

    कोल्हापूर- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसमान यात्रा आज कोल्हापूरच्या चंदगड विधानसभा मतदारसंघात पोहोचली आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघातील नेसरीमध्ये अजित पवार यांची जाहीर सभा होणार आहे. सभेआधी अजित पवार गटाकडून बाईक रॅली काढण्यात आली.

  • 27 Sep 2024 10:12 AM (IST)

    अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात पिकांना मोठा फटका, शेतकऱ्यांचे नुकसान

    छत्रपती संभाजीनगर- अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना 234 कोटींची भरपाई द्यावी लागणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक लाख 56 हजार क्षेत्रावरील खरीप पिकांसह फळबागांना फटका बसला आहे. दोन लाख 57 हजार बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 234 कोटींचा निधी लागणार आहे. 234 कोटींच्या भरपाईचा अहवाल जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांना सादर केला आहे.

  • 27 Sep 2024 09:45 AM (IST)

    सत्ता, केंद्रीय यंत्रणा हातात म्हणून भाईगिरी सुरू – संजय राऊतांचे अमित शाहांवर टीकास्त्र

    अमित शाह यांना जंजीर चित्रपट बघायला सांगा. सत्ता, केंद्रीय यंत्रणा हातात म्हणून त्यांची भाईगिरी सुरू आहे अशा शब्दांत संजय राऊत यांनी अमित शाहांवर टीकास्त्र डागले आहे.

  • 27 Sep 2024 09:32 AM (IST)

    विदर्भ, मराठवाड्यानंतर अमित शाहांच्या टार्गेटवर मुंबई

    विदर्भ, मराठवाड्यानंतर अमित शाहांच्या टार्गेटवर मुंबई असून मुंबईसाठी शाह यांनी विशेष प्लानिंग केलं आहे.

    शाह हे स्वतः मुंबईतील डेंजर झोनमधील मतदारासंघांचा विभागनिहाय आढावा घेणार असून ते  मुंबईत कार्यकर्त्यांशी संवादही साधणार आहेत.

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे मुंबई भाजप अलर्ट मोडवर असून पुढील तीन दिवस मतदारसंघ पिंजून काढण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना  देण्यात आले आहेत.

     

  • 27 Sep 2024 09:25 AM (IST)

    रत्नागिरी – मुसळधार पावसाचा फटका, दिवाणखवटी रेल्वे स्टेशनकडे जाणार रस्ता खचला

    रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील कोकण रेल्वे मार्गावरील दिवाण खवटी रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता मुसळधार पावसामुळे खचला आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. वाहन चालकांनी आणि प्रवाशांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले .

  • 27 Sep 2024 09:16 AM (IST)

    बुलढाणा – बोर्डी नदीवरील पूल ओलांडताना बैलगाडी पाण्यात पडली

    बुलढाण्यातील बोर्डी नदीवरील पूल ओलांडताना एक बैलगाडी पुराच्या पाण्यात पडली आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. मात्र ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवत बैलांसह गाडीतील दोन व्यक्तींना सुखरूप बाहेर काढलं.

  • 27 Sep 2024 09:08 AM (IST)

    सिनेट निवडणूकीची आज मतमोजणी

    सिनेट निवडणूकीचे आज मतमोजणी होणार आहे.  2024 सालच्या  मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक पार पडली असून आज पहिल्यांदाच  पोलीस बंदोबस्तात, आणि  सीसीटीव्हीच्या निगराणीखाली  मतमोजणी करण्यात येणार आहे.

  • 27 Sep 2024 08:36 AM (IST)

    Maharashtra News Live : पोर्शे कार अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या अडचणी वाढणार

    पुणे – पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या अडचणी वाढणार,

    – अल्पवयीन मुलावर येरवडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात कलमवाढ

    – रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी पुराव्यात छेडछाड, कट रचणे, खोटे दस्ताऐवज तयार करणे,

    – तसेच नमुने बदलण्यासाठी डॉक्टरांना लाच दिल्याने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमासह विविध कायद्यांनुसार मुलावर कारवाई होणार,

    – अपघात झाल्यापासून त्याच्या तपासातील अनेक टप्प्यांची माहिती देणारा पुरवणी अहवाल गुरुवारी पोलिसांकडून बाल न्याय मंडळास सादर केला,

    – त्यात पोलिसांनी वाढविलेली कलमे नमूद करण्यात आले आहेत,

    – या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता.

  • 27 Sep 2024 08:34 AM (IST)

    Maharashtra News Live : राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर, अमरावतीत बॅनरबाजी

    अमरावती : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मिशन विदर्भ

    आज पासून दोन दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर..

    अमरावतीच्या हॉटेल ग्रॅड मैफिल इन वर राज ठाकरेंचा असणार मुक्काम..

    ठाकरे घराण्यातील स्वाभिमानी भावी मुख्यमंत्री हिंदू जननायक असा राज ठाकरे यांचा बॅनर वर उल्लेख.

    राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमी मनसे कार्यकर्त्यांची अमरावती शहरात बॅनरबाजी.

    सकाळी 7.30 वाजता राज ठाकरे यांच अमरावती शहरात होणार आगमन

    अमरावतीत रेल्वे स्टेशनवर राज ठाकरेंच आगमन होताच मनसे कार्यकर्ते करणार जोरदार स्वागत

    विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची अमरावतीत घेणार राज ठाकरे बैठक

  • 27 Sep 2024 08:33 AM (IST)

    Maharashtra News Live : रत्नागिरीत मुसळधार पाऊस, मच्छीमारीला ब्रेक

    रत्नागिरी- समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम मच्छीमारीवर

    समुद्रात सध्या वादळी परिस्थिती, त्यामुळे मच्छीमारीला ब्रेक

    गेल्या चार दिवसांपासून कोकण किनारपट्टीवरची मासेमारी ठप्प

    बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर उतरले आहे

    त्या क्षेत्राचे ट्रफ उत्तर कोकण किनारपट्टीवर

    रत्नागिरी जिल्ह्यातील साडेतीन हजार मासेमारी बोटी किनाऱ्याला

    तीन दिवसांपासून मासेमारी ठप्प असल्याने जवळपास 25 कोटीची उलाढाल ठप्प

    ऐन मच्छीमारी हंगामात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका मच्छी व्यवसायिकांना

  • 27 Sep 2024 08:31 AM (IST)

    Maharashtra News Live : कल्याण डोंबिवलीत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस

    कल्याण डोंबिवलीत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस,

    मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचण्याच्या घटना

    मात्र अधूनमधून पावसाचा जोर कमी होत असल्याने साचलेल्या पाण्याचा होतोय निचरा