Maharashtra Breaking News LIVE 15 October 2024 : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आणखी एक मुंबई पोलिसांच्या ताब्यात

| Updated on: Oct 15, 2024 | 12:39 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 14 सप्टेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 15 October 2024 : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आणखी एक मुंबई पोलिसांच्या ताब्यात
महाराष्ट्रासह देशभरातील सर्व लाईव्ह अपडेट्स
Follow us on

LIVE NEWS & UPDATES

  • 15 Oct 2024 12:50 PM (IST)

    राज्यपाल नियुक्त सात आमदारांनी घेतली शपथ

    1- चित्रा वाघ, भाजप

    2- विक्रांत पाटील, भाजप

    3- धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड, भाजप

    4- हेमंत पाटील, शिवसेना, शिंदे गट

    5- ईदीस नाईकवाडी, राष्ट्रवादी, अजित पवार गट

    6- पंकज भुजबळ, राष्ट्रवादी, अजित पवार गट

    7- मनिषा कायंदे, शिवसेना, शिंदे गट

    या सात राज्यपाल नियुक्त आमदारांनी शपथ घेतली आहे.

     

  • 15 Oct 2024 12:40 PM (IST)

    छत्रपती संभाजी नगर शहरात लाडकी बहीण योजनेसाठी मोठी गर्दी

    छत्रपती संभाजी नगर शहरात लाडकी बहीण योजनेसाठी मोठी गर्दी झाली आहे. केवायसी करण्यासाठी महिलांची पोस्ट कार्यालयात गर्दी झाली आहे. हजारो महिलांची पोस्ट कार्यालयात गर्दी झाली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांनी तुफान गर्दी केली आहे.


  • 15 Oct 2024 12:35 PM (IST)

    राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी सुरू

    राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. शिंदे गटाचे नेते हेमंत पाटील यांनी शपथ घेतली. भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील यांना संधी देण्यात आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ यांनी आमदारकिची शपथ घेतली आहे.

  • 15 Oct 2024 12:32 PM (IST)

    शिदेंच्या शिवसेनेकडून मनिषा कायंदे यांनी घेतली शपथ

    शिदेंच्या शिवसेनेकडून मनिषा कायंदे यांनी आमदारकिची शपथ घेतली. मनिषा कायंदे यांना दुसऱ्यांदा विधान परिषदेत संधी देण्यात आली आहे.

  • 15 Oct 2024 12:30 PM (IST)

    आमदार बच्चू कडू हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

    प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी ते भेटीसाठी दाखल झाले आहेत. विधानसभेच्या निवडणुकी आणि जागा वाटप या विषयांवर चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.


  • 15 Oct 2024 12:20 PM (IST)

    माझ्या कार्यकाळातील आजची ही शेवटची सभा- अजित पवार

    “माझ्या कार्यकाळातील आजची ही शेवटची सभा आहे. उद्यापासून मी पक्षाचा प्रमुख म्हणून फिरणार आहे,” असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. आज राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत.

  • 15 Oct 2024 12:12 PM (IST)

    प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की माझा नेता मुख्यमंत्री व्हावा- नरेश म्हस्के

    “प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की माझा नेता मुख्यमंत्री व्हावा. महायुतीचा मुख्यमंत्री होणार. कार्यकर्त्यांना असं वाटतं की माझा नेता मुख्यमंत्री व्हावा. मला असं वाटतं की माझा नेता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील. सगळ्या कार्यकर्त्यांना असं वाटतं. त्यामुळे आमचं सरकार बहुमतात निवडून येईल. सगळ्यांना काम करावं लागेल. आपापसांत भांडत राहिलो तर काय होणार,” असं शिवसेना खासदार नरेश म्हस्के म्हणाले.

  • 15 Oct 2024 11:48 AM (IST)

    डोंबिवलीत होंडा ॲक्टीवा स्कूटीला भर रस्त्यात भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही

    डोंबिवलीत मिलापनगर येथे होंडा ॲक्टीवा स्कूटीला भर रस्त्यात भीषण आग लागली. अचानक गाडीला आग लागल्याने गाडी चालकाने प्रसंगावधान राखून गाडी सोडून काढला पळ.  स्थानिक नागरिकांनी पाणी मारत आग नियंत्रणात आणली , सुदैवाने जीवितहानी टळली.

     

  • 15 Oct 2024 11:42 AM (IST)

    आमची वाट लावाल तर मराठे तुमचीही वाट लावणार – मनोज जरांगे पाटील

    देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांकडे दुर्लक्ष करू नये. आमची वाट लावाल तर मराठे तुमचीही वाट लावणार, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

  • 15 Oct 2024 11:34 AM (IST)

    बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आणखी एक जण मुंबई पोलिसांच्या ताब्यात

    बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आणखी एक जण मुंबई पोलिसांच्या ताब्यात.  आरोपी धर्मराज कश्यप याच्या एका नातेवाईकाला बहराईच मधून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपीला घेऊन पोलिस मुंबईकडे रवाना झाले आहेत.

  • 15 Oct 2024 11:28 AM (IST)

    महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग, आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने परिवर्तन महाशक्तीची 17 तारखेला नियोजन ठक

    महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने परिवर्तन महाशक्तीची  नियोजन बैठक 17 ऑक्टोबरला होणार आहे.  संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी हे बैठकीस उपस्थित राहतील.

     

  • 15 Oct 2024 11:15 AM (IST)

    बारामती – धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या मागणी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोसायटीसमोर ढोल बजाव आंदोलन

    बारामती – धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या मागणी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटीच्या गेट समोर ढोल बजाव आंदोलन, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • 15 Oct 2024 11:06 AM (IST)

    महायुती सरकार न्यायव्यवस्थेलाही जुमानत नाही – वरुण सरदेसाई यांची टीका

    विधानपरिषदेतील 12आमदारांच्या नियुक्तीचे प्रकरण कोर्टात असताना, निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. हा विषय न्यायप्रविष्ट असताना हे सरकार नेमणूक कशी करू शकते? महायुती सरकार न्यायव्यवस्थेलाही जुमानत नाही, हेच यावरुन दिसते, अशी टीका शिवसेना उबाठा गटाचे नेते वरूण सरदेसाई यांनी केली आहे.

     

  • 15 Oct 2024 10:55 AM (IST)

    Maharashtra News: जेष्ठ नेते मधुकर पिचड अत्यवस्थ

    जेष्ठ नेते मधुकर पिचड यांना पहाटेच्या दरम्यान आला ब्रेनस्ट्रोक… राजूर येथील राहत्या घरी असताना पिचडांना ब्रेनस्ट्रोक…

  • 15 Oct 2024 10:55 AM (IST)

    Maharashtra News: महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

    थोड्याच वेळात राज्यपाल सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात दाखल होणार आहेत  राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना शासकीय सलामी देण्यात येणार आहे… राज्यपालांच्या दौऱ्यानिमित्त शासकीय विश्रामगृहाबाहेर मोठा पोलीस पाऊस फाटा तैनात करण्यात आला आहे. सोलापूर शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांशी राज्यपाल संवाद साधतील

  • 15 Oct 2024 10:40 AM (IST)

    Maharashtra News: राज्यपालांच्या निर्णयाविरोधात काही जण करणार याचिका

    राज्यपालांच्या निर्णयाविरोधात काही जण याचिका करणार आहेत… जर १२ च्या आधी सुनावणी झाली तर स्टे पण मिळू शकतो… राज्यपाल आपल्या अधिकाराचा गैरवापर करत आहेत… जी नावं जाहीर झालेली आहेत ती कधी सामाजिक क्षेत्रात होती. त्यांनी नावांचीं छाननी केली आहे का? राज्यपालाच्या निर्णयाला आव्हान दिलं जाऊ शकत नाही पण आव्हान देण्याची एक प्रक्रिया उपलब्ध आहे.

  • 15 Oct 2024 10:26 AM (IST)

    Maharashtra News: टोल नाक्यावर सेना-भाजप आणि मनसे कडून बॅनरबाजी

    एकीकडे टोल फ्री केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभाराचे बॅनर लागले आहेत. तर दुसरीकडे मनसेकडून राज साहेब यांचे अभिनंदनचे बॅनर मनसे कार्यकर्त्यांकडून टोल नाका परिसरात लावण्यात आले आहेत… मनसेच्या आंदोलनाला मोठे यश मुंबईकरांना टोल माफी…

     

  • 15 Oct 2024 10:05 AM (IST)

    Maharashtra News: मुलुंड टोल नाक्यावर पुन्हा वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

    हलक्या वाहनांसाठी टोलमाफीची अंमलबजावणी सुरू असतानाही, अवजड वाहनांसाठी टोल वसुली सुरू. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी… वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहून वाहनचालक त्रस्त झाले असून ही परिस्थिती तात्काळ सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे…

  • 15 Oct 2024 09:57 AM (IST)

    भाजपने लावलेल्या बॅनरवर अजितदादांचा फोटो वगळला

    जळगावत लाडकी बहिण योजनेसंदर्भात भाजपने लावलेल्या बॅनरवर अजित पवार यांचा फोटो वगळला आहे. बॅनरवर महापुरुषांच्या फोटो नंतर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो नसल्यामुळे भाजपने लावलेल्या या भव्य बॅनरची जळगावात चर्चा रंगली आहे. भाजपने लावलेल्या बॅनरवर अजित पवार यांचा फोटो नसल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

  • 15 Oct 2024 09:45 AM (IST)

    महायुतीचे सरकार बहुमताने येणार; या आमदाराला विश्वास

    राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार बहुमताने येणार,  बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी विश्वास व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत जो निरेटिव्ह सेट केला होता तो संपला आहे. त्यामुळे आता महायुती सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही. विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगलं बहुमत मिळेल. महायुती सरकारने सकारात्मक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील 80 टक्के माता भगिनी महायुतीला आशीर्वाद देतील, असं राऊत म्हणाले.

  • 15 Oct 2024 09:30 AM (IST)

    संजय राऊतांची पत्रकार परिषद

    संजय राऊतांची पत्रकार परिषद सुरु आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे. निवडणूक आयोगाने पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी. निवडणूक आयोगाने जागृक राहावं, असं संजय राऊत म्हणाले.

  • 15 Oct 2024 09:15 AM (IST)

    ठाण्यात वाहतूक कोंडी

    ठाण्यात आज वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. सिग्नल यंत्रणेमुळे वाहतूक कोंडी झाली आहे. आनंद नगर जकात नाका ते तीन हात नाका पर्यंत वाहतूक कोंडी झालीय. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची दोन ते तीन किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्यात. हलक्या वाहनांना टोलमुक्त करून देखील वाहतूक कोंडीचा सामना चाकरमान्यांना करावा लागत आहे. रुग्णवाहिकांना देखील वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. काल मध्यरात्रीपासून लहान वाहने टोल फ्री झाली मात्र वाहतूक कोंडी पासून कधी फ्री होणार असा सवाल पुन्हा एकदा वाहनधारक उपस्थित करत आहेत.

  • 15 Oct 2024 08:45 AM (IST)

    Maharashtra News Live Update : उदय सामंत आणि जरांगे यांच्यात दोन तास चर्चा

    मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. अंतरवाली सराटीमध्ये मध्यरात्री उदय सामंत आणि जरांगे यांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. उदय सामंत आणि जरांगे यांच्यात दोन तास चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.

  • 15 Oct 2024 08:42 AM (IST)

    Maharashtra News Live Update : दहिसर टोलनाक्यावर मनसेकडून फटाक्यांची आतषबाजी

    दहिसर टोलनाक्यावर मनसेची फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळत आहे. रात्री 12 वाजता दहिसर टोल नाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला जात आहे. रात्री 12 वाजताच दहिसर टोल नाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी टोल ओलांडणाऱ्या कार चालकांना मिठाई दिले.

     

  • 15 Oct 2024 08:41 AM (IST)

    Maharashtra News Live Update : टोलमाफीच्या निर्णयानंतर राहुल शेवाळेंकडून पेढे वाटून सेलिब्रेशन

    राज्य सरकारने आपल्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये मुंबई प्रवेश द्वारावर असलेल्या पाचही टोल नाक्यावर वाहनांना टोल माफीचा निर्णय घेतला आणि राज्यात अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला,रोजच्या रोज प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना याचा मोठा फायदा होणार असल्याने आपल्याला दिवाळी भेट मिळाल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली. याच अनुषंगाने शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी वाशी टोल नाक्यावर येऊन एकच जल्लोष केला. रात्री 12 वाजता या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याने याच वेळी शेवाळे आणि शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने याठिकाणी येऊन प्रवाशांना पेढे वाटून आनंद साजरा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील अडीच वर्षात अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले त्यात लाडकी बहिण आणि टोल माफी आणि इतर अनेक निर्णयामुळे करोडो नागरिकांना याचा थेट फायदा झाला असून, शिंदे सरकारने पुन्हा एकदा सर्व सामान्य जनतेचे सरकार असल्याचे दाखवून दिले आहे. या निर्णयामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संपूर्ण मंत्री मंडळाचे आभार व्यक्त करून संपूर्ण राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत असल्याची प्रतिक्रिया शेवाळे यांनी दिली.

     

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. यंदा महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. त्यातच राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजच महायुतीच्या ७ आमदारांचा शपथविधी होणार असल्याचे बोललं जात आहे. त्यासोबतच राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी विविध धक्कादायक खुलासे होताना दिसत आहे. यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.