एका मताला अडीचशे रुपये, गाव विकायला निघाला, सहकारी पक्षानं केली अजितदादांची कोंडी

| Updated on: Nov 06, 2023 | 5:01 PM

ग्रामपंचायतीचे सोळा सदस्य आहेत. इथं अनेक वर्षांपासून अजित पवारांची सत्ता राहिली आहे. यंदा अजित पवार यांचं जय भवानी पॅनेल मैदानात आहे. त्यांच्या विरोधात भाजपचं बहुजन ग्रामविकास पॅनेल लढत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काटेवाडीमध्ये अजित पवारांची सत्ता आहे. यंदा काय होतं याचा फैसला काही तासातच होणार आहे.

एका मताला अडीचशे रुपये, गाव विकायला निघाला, सहकारी पक्षानं केली अजितदादांची कोंडी
AJIT PAWAR AND DEVENDRA FADNAVIS
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

अभिजित पोटे, बारामती | 5 नोव्हेंबर 2023 : बारामतीमध्ये अजित पवारांच्या पॅनेल विरोधात भाजपचं पॅनेल उभं राहिलं आहे. मात्र, आज अजित पवार गटानं पैसे वाटल्याचा आरोप भाजप समर्थकांनी केलाय. राज्यामध्ये युती असली तरी अजित पवारांच्या गावामध्ये मात्र त्यांचा आणि भाजपचे समर्थक आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. अजित पवार यांच्या पॅनेलनं मतदानाप्रमाणे दोनशे पन्नास रुपये वाटप केल्याचा आरोप भाजपच्या पांडुरंग कचरे यांनी केलाय. तर, त्याचे पुरावे देण्याचं आव्हान अजित पवार गटाकडून करण्यात आलंय.

काम कोण करतंय याच्यापेक्षा नाव मोठं आणि लक्षण खोटं अशी या ठिकाणी परिस्थिती आहे. आमचा गाव विकायला निघाला होता. अडीचशे रुपये एका मताला आमचा गाव विकायला निघलेला आहे. युवकांचे प्रश्न आहेत गावामध्ये क्रीडांगण नाही. आमच्या गावामध्ये उद्यान नाही. आमच्या गावामध्ये शौचालय नाही, असे अनेक प्रश्न याठिकाणी आहेत. शंभर टक्के होणारी निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. चार हजाराच्या आसपास लोकांना पैसे वाटलेले आहेत. हे पैसे चोरी केलेले आहेत. तुमचे गटारात खाल्लेले आहेत, रस्त्यात खाल्लेले, संडासात खाल्लेले, स्लबमध्ये खाल्लेले आहेत. तुम्ही ते पैसे घ्या, असा आरोप पांडुरंग कचरे यांनी केलाय.

पांडुरंग कचरे यांच्या या आरोपाला अजितदादा समर्थकांनी उत्तर दिलंय. कुणी काय आरोप करायचे त्याला कुणाला आपण बंधन घालू शकत नाही? पण, त्याचे पुरावे काय? कुणी मी त्यांनी वाटले पैसे त्यांनीही पाचशे रुपयाने वाटले असं माझाही आरोप आहे. पण तो त्यांनी विश्वास केला की त्यांची हे बघा आता प्रत्येक जण प्रत्येकाला विश्वास करणारच पण तुम्ही पाठीमागच्या पंचवार्षिकमध्ये जर बघितलं तर आम्ही त्यांचा दारुण पराभव केला होता, असे दादा समर्थक म्हणाले.

हे सुद्धा वाचा

गावातला हा वाद वरच्या नेत्यांपर्यंत पोहोचलाय. त्यात भाजपच्याच मुनगंटीवारांनी पैसे वाटण्यावरून भाजपच्याच कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावलेत. ज्यांना पराभवाची खात्री असते तेच असे आरोप करतात असं मुनगंटीवार म्हणाले. तो आरोप करतो जेव्हा त्यांचा हे निश्चित होतं की आम्हाला हरायचं आहे. मग हारण्याचं कारण आपण आपलं विचारधारा सांगू शकत नाही. पण तुम्ही विसरता की हा मतदारांचा अवमान करत आहात. म्हणून मग मतदार म्हणतात की नेते विकाऊ आहे, आम्ही विकाऊ नाही असे मुनगंटीवार म्हणाले.

तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी असे जर होत असेल तर गृहमंत्र्यांनी याचा जवाब द्यायला हवा. अजित पवार गट पैसे वाटतोय तर राज्याचे गृहमंत्री आहेत की नाही? ते इथे आहेत का दुसऱ्या राज्यात प्रचाराला गेलेत हे ही माहिती नसतं आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही न्याय आणि दाद कोणाला मागायची. भारतीय जनता पक्षाची ज्याची सत्ता आहे ज्याचा गृहमंत्री आहे. त्याला मीडियाकडे जायला लागत असेल तर याच्यातच गृहमंत्री याचे अपयश आहे, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.