नाशिक : नाशिक शहरात झालेल्या अपघाताने नाशिककर (Nashik) सुन्न झाले आहे. दोन्हीही घटनेत ट्रकने दुचाकी चालकाला चिरडल्याने दोघेही जागीच ठार (Death) झाले आहे. नाशिकरोड आणि वलखेड फाटा येथे अपघात (Accident) झाले आहे. दोन्हीही ठिकाणी मालवाहतूक करणाऱ्या ट्रक भरधाव वेगाने असल्याने दुचाकी चालकांचा चिरडून मृत्यू झाला आहे. नाशिक-पुणे आणि वणी-दिंडोरी रोडवरील अपघाताची बातमी नाशिकमध्ये वाऱ्यासारखी पसरली आहे. त्यात अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
नाशिक-पुणे रोडवर अपघात झाला त्यात रस्ता ओलंडतांना ट्रकचा धक्का लागल्याने दुचाकी चालक राजेश पटेल यांचा मृत्यू झाला आहे.
राजेश पटेल हे बांधकाम व्यावसायिक असून गंधर्व नगरी येथील रहिवाशी आहेत, नाशिकरोड परिसरात झालेल्या अपघातानंतर बराच वेळ वाहतूक कोंडी झालेली होती.
ह्या अपघाताची भीषणता इतकी होती की यामुळे मृत व्यक्तीचे शरीर छिन्नविच्छिन्न झाले होते. महामार्गावर दुतर्फा वर वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
काही वेळातच रुग्णवाहिका तसेच उपनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली.
तर दूसरा अपघात हा दिंडोरी-वणी रस्त्यावरील वलखेड फाटा येथील वळणावर वलखेड रोडला अवनखेड हद्दीत झाला आहे. त्यात एक जण जागीच ठार झाला आहे.
रस्त्यावर उभे असलेल्या नाशिक येथील कपालेश्वर फार्मा कंपनीचा कामगार संजय एकनाथ निकम हे ठार झाले आहे.
यावेळी ट्रक चालकाने गर्दीचा फायदा घेत अपघातस्थळावरून पळ काढल्याचे समोर आले आहे. रुग्णवाहिका बोलावून मृतदेह सरकारी दवाखाना दिंडोरी येथे पाठवण्यातआला.