मुंबई : शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर सेनेत दोन गट निर्माण झाले आहेत. शिंदे (Eknath shinde) आणि ठाकरे (Uddhav Thackeray) असे दोन गट निर्माण झाले आहे. त्यातच शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळवण्यासाठी दोन्ही गटाकडून प्रयत्न सुरू होता. त्यातच निवडणूक आयोगाने नावासहित चिन्हं गोठवल्याने आता नव्या नावासहित चिन्हाचे तीन पर्याय द्यावे लागणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी याबाबत दुखचं नाही तर राग आल्याचे देखील बोलून दाखवले आहेत. पण यावेळी एकनाथ शिंदे गटावर टीका करत असतांना त्यांनी गंभीर आरोप केला आहे. ज्या शिवसेनेने राजकीय जन्म दिला, त्याच शिवसेना आईच्या काळजात तुम्ही कट्यार घुसवला असे म्हणत ठाकरेंनी नाव आणि चिन्ह गोठवल्याची खंत बोलून दाखवली आहे. त्यामुळे तुम्हाला बाळासाहेब आणि शिवसेना नाव वापरण्याचा अधिकार नसून हिंमत असेल तर नवीन पक्ष काढा नाहीतर भाजपमध्ये जा असा सल्ला ठाकरेंनी दिला आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच लाईव्ह संवाद साधत शिंदे गटासह भाजपवर हल्लाबोल केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह संवाद साधत असतांना दसरा मेळाव्याला शिवतीर्थ मिळू नये यासाठी प्रयत्न करत होते असे म्हणत त्यांचा मेळावा म्हणजे पंचतारांकित मेळावा असल्याची टीका केली.
ही टीका करत असतांना खोके सुर म्हणून ठाकरे गटाला हिणावले आहेत, तर 40 डोक्याचे रावण म्हणून देखील शिंदे गटावर हल्लाबोल ठाकरेंनी केला आहे.
शिवसेना संपवायला निघाले होते, शिवसेना संपत नाही म्हणून फोडाफोडी करून शिवसेना संपवत असल्याचे ठाकरेंनी बोलून दाखवत भाजप यामागे असल्याचा रोख ठाकरेंनी लावून धरला होता.
सुरुवातीपासूनच उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका करीत असून नाव आणि चिन्ह गोठवल्याने ठाकरे अधिकच आक्रमक झाले आहेत.