Uddhav Thackeray : “देवेंद्र फडणवीस यांना सांगताही येत नाही आणि…”, उद्धव ठाकरे यांनी केली बोचरी टीका

| Updated on: Jul 10, 2023 | 7:20 PM

राज्यातील राजकीय घडामोडीनंतर उद्धव ठाकरे यांनी राज्याचा दौरा सुरु केला आहे. उद्धव ठाकरे यांनी नागपूरमधून दौऱ्याची सुरुवात केली आहे. या दौऱ्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

Uddhav Thackeray : देवेंद्र फडणवीस यांना सांगताही येत नाही आणि..., उद्धव ठाकरे यांनी केली बोचरी टीका
उद्धव ठाकरे यांची फडणवीसांवर टीका
Follow us on

नागपूर : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दोऱ्याचा हा दुसरा दिवस आहे. या दौऱ्यात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या संवादावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय वातावरणावर टीका केली. काल परवापर्यंत जवळ असलेल्या अजित पवार यांच्यावरही नाव न घेता टीका केली. त्यांचा विकास पुरुष असा उल्लेख करून डिवचलं. तसेच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“कट्टा गहाण टाकला जातो आणि त्याच्यावर पैसे उधार दिले जातात. माझ्या शेतकऱ्याला जर कर्ज हवं असेल त्याचं घर, जमिन आणि पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवावं लागतं. इथे गावठी कट्टा गहाण ठेवल्यावर पैसे देणारी अवलाद नागपूरच्या गृहमंत्र्यांच्या गावात देणारी आहे. याला दुर्भाग्य म्हणायचं नाही तर काय म्हणायचं. संताप यासाठीच येतो की, माझी खुर्ची काढून घेतली यासाठी नाही. तुम्ही जी खूर्ची उबवतात त्यात नासलेली ढेकणं तयार होत आहेत, याचा तुम्ही काय अंदाज घेतात की नाही.” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

“देवेंद्र फडणवीस आपले माननीय उपमुख्यमंत्री..त्यांची परिस्थिती आता विचित्र झाली आहे. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. काय झालं आहे. तेव्हा ते सांगतात काय नाही. काय नाही. पण झालंय काहीतरी नक्की पण सांगण्यासारखं नाही आहे. बोलावे तसे चालावे त्याची वंदावी पावले.” असं टीकास्त्र देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडलं. तसेच हे सांगत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक क्लिप ऐकवली. यात राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणार नाही असं सांगितलं होतं. पण आज काय केलं आहे लोकांनी पाहिल्याचं त्यांनी संगितलं. यापुढे जात उद्धव ठाकरे यांनी त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहे असं सांगितलं.