मुंबईतील मोर्चाला फडणवीस नॅनो म्हणाले होते; उद्धव ठाकरे यांनी थेट फडणविसांची साईजच काढली

| Updated on: Dec 20, 2022 | 6:38 PM

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या मोर्चासह त्यांच्या पक्षावर जोरदार टीका केली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला आहे.

मुंबईतील मोर्चाला फडणवीस नॅनो म्हणाले होते; उद्धव ठाकरे यांनी थेट फडणविसांची साईजच काढली
Image Credit source: Google
Follow us on

नागपूर : मुंबई येथे मागील आठवड्यात महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी भाजपसह राज्यपाल यांच्या विरोधात महाविकास आघाडीने महामोर्चा काढला होता. यामध्ये स्वतः उद्धव ठाकरे यांनी चालत महमोर्चात सहभाग घेतला होता. इतकंच काय ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब या मोर्चात सहभागी झाले होते. महाविकास आघाडीचे सर्वच नेते या महामोर्चात सहभागी झाले होते. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे आमदार, खासदार यांनी महमोर्चात सहभाग घेऊन भाजप सरकारवर हल्लाबोल केला होता. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेल्या मोर्चा नॅनो मोर्चा म्हणून टीका केली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी पलटवार करत थेट देवेंद्र फडणवीस यांच्या शरीरयष्टीवर टीका केली आहे. आमचा मोर्चा हा देवेंद्र फडणवीस साईज मोर्चा होता असं म्हणून उद्धव ठाकरे यांनी एका वाक्यातच पलटवार केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या मोर्चा नंतर टीका केली होती, यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या मोर्चासह त्यांच्या पक्षावर जोरदार टीका केली होती. त्यावर आज उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला आहे.

हे सुद्धा वाचा

सगळे पक्ष एकत्र येऊन एवढा लहानसा मोर्चा निघाला, आज कोणही ड्रोन शॉटस दाखवू शकला नाही. आज क्लोजअप दाखवावे लागले. ड्रोन शॉटस दाखवण्या लायक मोर्चाच नव्हता.

आम्हाला हे आधीही माहिती होतं, आम्ही त्यांना विनंती केली होती की आझाद मैदानावर या, पण त्यांच्याजवळ आझाद मैदानावर राहील एवढी संख्या नसल्याने त्यांनी जिथे रस्ता लहान होतो, निमुळता होतो अशी जागा त्यांनी निवडली,

त्यामुळे या मोर्चाचे कुठले विराट स्वरूप उद्धव ठाकरे यांना दिसलं? जसा त्यांचा पक्ष नॅनो होतोय तसा मोर्चाही नॅनोच आहे. अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

यावरच पलटवार करत असतांना उद्धव ठाकरे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्या शरीरयष्टीवर टीका केली आहे. आमचा मोर्चा देवेंद्र फडणवीस साईज होता असं म्हणून जहरी टीका केली आहे.