रत्नागिरीः सध्या महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडून जोरदार सभा घेतल्या जात आहेत. एकीकडे शिवगर्जना यात्रेतून सत्ताधाऱ्यांना जाब विचारला जात आहे, तर दुसरीकर शिवसेना पक्षावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. हे सर्व चालू असतानाच आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या रत्नागिरीमध्ये जाहीर सभा होत आहे. त्यामुळे ठाकरे गटाने आता कार्यकर्त्यांना आवहन करत. या सभेला मुस्लिम बांधवांनीह उपस्थित राहावे असं थेट जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
ठाकरे गटाचे हे जाहीर आवाहनच सत्ताधाऱ्यांनी टीकेच्या पहिल्यास्थानावर आणले असून रत्नागिरीलतील या सभेचा मुस्मिम बांधवांवर कोणताही परिणाम होणार नाही असं मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटेल होते.आता त्यांच्या या वक्तव्याला थेट आमदार भास्कर जाधव यांनी उत्तर दिले आहे.
आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेच्या आणि भाजपच्या नेत्यांवर या सभेच्या निमित्ताने जोरदार हल्लाबोल केला आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टीला धडा शिकवण्याचा निर्धार करत ही उद्याची सभा होत आहे. त्यामुळे भास्कर जाधव यांनी भाजपवर हल्लाबोल करत त्यांना थेट आव्हान देण्यात आले आहे.
भारतीय जनता पार्टीला धडा शिकवण्याचा निर्धार करत ही उद्याची सभा होत असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. त्याच बरोबर ही सभा होत असल्यान कोकणातील माणसांना आगामी निवडणुकीच्या काळात विश्वास देणारी सभा असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वीच ठाकरे गटाने आता शिवसेनेतील काही नेते आणि पदाधिकारीही ठाकरे गटात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले आहे.
त्यामुळे या गोष्टीमुळे आणि राजकारण तापले आहे.शिंदे गट एकीकडे आमदार खासदार पळवत असतानाच ग्रामीण भागातील ठाकरे गट मात्र उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठामपणे उभा असल्याचेही त्यांनी दाखवून दिली आहे.
पोटनिवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कोकणातील सभा म्हणजे कोकण भाषांचा सन्मान असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या सभेवेळी अनेकांचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचेही त्यानी यावेळी सांगितले.अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबतच शिंदे गटातील देखील काही कार्यकर्ते पक्षप्रवेश करणार असल्याचे भास्करराव जाधव यांनी सांगितले. रत्नागिरीच्या या सभेमुळे ठाकरे गट आणि शिवसेनेचा वाद आणखी उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.