उद्धव ठाकरे यांची नवी ओळख ‘घरबस्या मुख्यमंत्री’, नेमकं काय म्हणाला भाजपचा ‘हा’ नेता?

| Updated on: Aug 07, 2023 | 6:48 PM

भाजपाची चिंता तुम्ही करु नका, तुमचे चिन्ह गेले. पक्ष गेला, तुमचं नेतृत्व राहिले नाही. संविधान गेले, आमदार गेले, खासदार गेले त्याची चिंता तुम्ही करा. आता तरी दुसऱ्याच्या घरात डोकावून बघण्याचे सोडा...

उद्धव ठाकरे यांची नवी ओळख घरबस्या मुख्यमंत्री, नेमकं काय म्हणाला भाजपचा हा नेता?
Uddhav Thackeray VS Devendra Fadnavis
Follow us on

मुंबई । 7 ऑगस्ट 2023 : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल संभाजी बिग्रेडच्या मेळाव्याला संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. एक पक्ष फोडला, दुसरा फोडला आता तिसरा पक्ष फोडण्याची तयारी सुरु असल्याचं कळतंय. एक उपमुख्यमंत्री, दुसरा मुख्यमंत्री आणि आता तिसरा पक्ष फोडल्यावर तिसरा उपमुख्यमंत्री. मग, देवेंद्र फडणवीस केवळ मस्टर मंत्री रहाणार का? असा उपरोधिक टोला लगावला होता. त्यावरून भाजपच्या नेत्याने उद्धव ठाकरे यांना ‘घरबस्या मुख्यमंत्री’ अशा शब्दात फटकारलंय.

जे मुख्यमंत्री ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या पलिकडे कधी गेले नाही, जे स्वत: घरात बसून राहिले, त्या नॉन परफॉर्मिंग मुख्यमंत्र्यांना परफॉर्मिंग उपमुख्यमंत्री कसे कळणार? असा सवाल मुंबई भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केला.

हे सुद्धा वाचा

भाजपाची चिंता तुम्ही करु नका, तुमचे चिन्ह गेले. पक्ष गेला, तुमचं नेतृत्व राहिले नाही. संविधान गेले, आमदार गेले, खासदार गेले त्याची चिंता तुम्ही करा. आता तरी दुसऱ्याच्या घरात डोकावून बघण्याचे सोडा, असा टोलाही त्यांनी लगावला.

आमच्या नेतृत्वाबर तुम्ही काहीच बोलू नका. तुमचे आमदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटा दाखवून निवडून आले होते. तुमचे सुपूत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटा लावून निवडून आले आहेत हे विसरु नका असे ते म्हणाले.

हिंदू जनआक्रोश मोर्चावर केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, तुमचे जे पाकडयांवरचे प्रेम आहे ते जनतेसमोर मांडण्यासाठीच हे मोर्चे निघत आहेत. आपली औरंगजेबाप्रती असलेली निष्ठा उघड करण्यासाठी हे मोर्चे आहेत. हिंदू एकत्र आले की तुम्हाला त्रास का होतो, असा सवाल त्यांनी केला आहे.

गेली पंधरा वर्ष उद्धव ठाकरे यांची भाषणे ऐकली तर याच्या छाताडावर बसू, त्याच्या छाताडावर बसू यापेक्षा वेगळे काहीच बोलत नाही. आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही मस्टर उपमुख्यमंत्री संबोधता. पण, उध्दव ठाकरे तुमची ओळख घरबस्या मुख्यमंत्री अशी झाली आहे आहि त्याकडे पहा अशा शब्दात आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना फटकारलं आहे.