मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray live) यांनी राज्याला संबोधित केलं. महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने, लॉकडाऊनचा धोका टळलेला नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. आधी जीव वाचले पाहिजे, मग पुढचं बघू, आज पूर्ण लॉकडाऊन इशारा देतोय. पुढील दोन दिवसात दुसरा पर्याय दिसला नाही तर जग जे करतंय तोच पर्याय स्वीकारावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray)
येत्या काही दिवसात मी तज्ज्ञांशी, पत्रकारांशी बोलेन. मला वेगळा उपाय काय तो सांगा. लॉकडाऊन हा उपाय नाही मान्य. पण संसर्गाची साखळी तोडायची कशी? लसीकरण वाढवा म्हणता, तो वाढवतोच आहे. पण लसीने कोरोना होत नाही असं नाही. जर ही परिस्थिती अशीच राहिली तर आपल्याला परत लॉकडाऊन करायचा की काय ही शक्यता आहे. ती अजूनही टळलेली नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
कोरोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्र लॉकडाऊनच्या (Maharashtra second lockdown) उंबरठ्यावर आहे. एकीकडे पुण्यात मिनी लॉकडाऊन (Pune lockdown) लावण्यात आला आहे. पुण्यात 7 दिवसांसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. पुण्यात संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल, तर दिवसा जमावबंदी लावण्यात आली आहे.
कडक निर्बंध लावावे लागतील, उद्या परवा जाहीर करु, गर्दी टाळावी लागेल, ऑफिसेसना नियमावली हवी, बसना नियम, रेल्वे, बस तुडुंब आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेली तर ब्राझीलसारखा शुकशुकाट दिसेल. रोजगारही गेला आणि जीवही गेला. तसं होऊ नये. येत्या दोन तीन दिवसात मी पुन्हा बोलेन. मी तज्ज्ञांशी बोलेन, मला पर्याय सांगा, लॉकडाऊन पर्याय नाही मान्य, मग करायचं काय जरुर सांगा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
पहिला जीव वाचवायचा आहे, आज इशारा देतोय, पूर्ण लॉकडाऊनचा, दोन दिवसात दृश्य परिणाम दिसला नाही, किंवा दुसरा पर्याय मिळाला नाही, तर जगामध्ये जे सुरु आहे, पहिला लॉकडाऊन, दुसरा लॉकडाऊन होतोय.. त्यामुळे आता ठरवायला हवं, ही लाट मी रोखेनच पण पुढची लाट येऊ देणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
संबंधित बातम्या
मुंबई, पुण्यासारख्या इतर मोठ्या शहरात काय होणार? मुख्यमंत्री म्हणतात, 48 तासात नवे निर्बंध
CM Uddhav Thackeray PC : लस म्हणजे धुवाँधार पावसातील छत्री, मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे मुद्दे
महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार का? वाचा लाखमोलाच्या सवालावर मुख्यमंत्र्यांचं थेट उत्तर
“कोरोनाची दहशत गेल्याने आपण गाफील झालो. अजूनही कोरोनाने मात केलेली नाही. आपणत त्यांच्यावर मात करायची आहे. मी सर्व राजकारण्यांना विनंती करतो, कृपा करा जनतेच्या जीवाशी खेळ होईल असं राजकारण करु नका. सरकार जे पावलं उचलत आहे ते जनतेच्या हितासाठी उचलत आहे. आपल्याला जनतेचं जीव वाचवायचं आहे. मी आजसुद्धा लॉकडाऊनचा इशारा देतोय. मी दोन दिवस परिस्थिती बघतोय. आतापासून आपण ठरवूया. ही लाट रोखेलच पुढची लाटही रोखूया”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
पहिला जीव वाचवायचा आहे, आज इशारा देतोय, पूर्ण लॉकडाऊनचा, दोन दिवसात दृश्य परिणाम दिसला नाही, किंवा दुसरा पर्याय मिळाला नाही, तर जगामध्ये जे सुरु आहे, पहिला लॉकडाऊन, दुसरा लॉकडाऊन होतोय.. त्यामुळे आता ठरवायला हवं, ही लाट मी रोखेनच पण पुढची लाट येऊ देणार नाही.
कडक निर्बंध लावावे लागतील, उद्या परवा जाहीर करु, गर्दी टाळावी लागेल, ऑफिसेसना नियमावली हवी, बसना नियम, रेल्वे, बस तुडुंब आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेली तर ब्राझीलसारखा शुकशुकाट दिसेल. रोजगारही गेला आणि जीवही गेला. तसं होऊ नये.
येत्या दोन तीन दिवसात मी पुन्हा बोलेन. मी तज्ज्ञांशी बोलेन, मला पर्याय सांगा, लॉकडाऊन पर्याय नाही मान्य, मग करायचं काय जरुर सांगा.
“अनेक देशांमधील परिस्थिती नाजूक आहे. फ्रान्समध्ये तिसऱ्यांदा राष्ट्रीय लॉकडाऊन लागू, या लॉकडाऊन काळात जीवनाश्यक वस्तूंच्या दुकानांना उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील तीन आठवड्यांसाठी शाळा पूर्णपणे बंद, सर्व राजकीय कार्यक्रमांना बंदी, अशी फ्रान्समधील परिस्थिती आहे. हंगेरीमध्येही वर्क फ्रॉम होम, डेनमार्कमध्येही तीच परिस्थिती, ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध हटवण्यास सुरुवात झाली आहे. बेल्जियमने एक महिना परत लॉकडाऊन लागू केलाय. पोर्तूगाल सरकारने शहराशहरामधील नागरिकांची ये-जा थांबवली आहेत. आयर्लंडमध्ये डिसेंबर पासून कडक निर्बंध आहे. फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहे. यूकेतही अडीच-तीन महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर शिथिलता दिली जाते. इटली, जर्मनीतही तीच अवस्था आहे. लॉकडाऊन घातक आहे. पण एका कात्रीत आपण सापडलोय. एका बाजूला अर्थचक्र आहे. अर्थचक्र चालू ठेवलं तर अनर्थ घडतोय”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
आरोग्य सुविधा सुधारणं म्हणजे फर्निचर उभं करणं नाही, तज्त्ज्ञ डॉक्टर हवेत. लॉकडाऊन लावल्यावर रस्त्यावर उतरु जे म्हणतात, त्यांनी जरुर रस्त्यावर उतरावं, त्यांनी मदतीसाठी रस्त्यावर उतरावं, आपल्याला ही लढाई हातात हात घालून लढावी लागेल
लॉकडाऊन करायंच की नाही, तर परदेशातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अमेरिका, ब्राझील, रशिया, फ्रान्समध्ये बिकट अवस्था, फ्रान्समध्ये तिसऱ्यांदा लॉकडाऊन आहे. केनिया, यूकेसारख्या अनेक देशात कडक लॉकडाऊन आहे.
लॉकडाऊन हा घातक, आपण कात्रीत सापडलोय, अर्थचक्र की माणसं वाचवायचं हा प्रश्न आहे
“आज 45 हजार नवे रुग्ण वाढण्याची शक्यता. आपण कोणत्या दिशेला चाललोय? याच वेगाने जर रुग्णवाढ होत राहिली तर.. विगलीकरणात सध्या 2 लाख 20 हजार बेड्स आहेत. त्यापैकी 1 लाख 37 हजार बेड्स भरले गेले आहेत. म्हणजे 65 टक्के बेड्स भरले आहेत. आयसीयू बेड्स हे 20519 आहेत. ते जवळपास 48 टक्के भरले आहेत. ऑक्सिजन आणि व्हेंटिलिटर्स बेड्स 25 टक्के भरले आहेत. ही परिस्थिती अशीच राहीली तर सर्व सुविधा अपुऱ्या पडतील”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
आपण लसीकरण वाढवतोय, समाधानाची बाब म्हणजे महाराष्ट्र हे देशातील नंबर एक राज्य ठरलं, आपण एका दिवसात ३ लाख लोकांना लसीकरण केलं. आतापर्यंत सुमारे ६५ लाख लोकांना लसीकरण केलं. अजूनही मागणी करतोय, पण केंद्राने पुरवठा वाढवायला हवा. आजची आपली क्षमता ३ लाख आहे, ती ६-७ लाख करण्याची तयारी आहे. पण लस आम्ही मागणी करतोय.
लस घेऊनही काही जण बाधित होत आहे. पण लस नाही तर मास्कही कायम ठेवा. लस घेऊनही काहीजण बाधित होत आहेत हे पंतप्रधानांना सांगितलं. मोदी म्हणाले लस घेतली म्हणजे संसर्ग होणार नाही असं नाही, पण त्याची तीव्रता कमी होईल..
लस म्हणजे धुवाँधार पावसातील छत्री, पण आप्लयासमोर वादळ आहे, कमीत कमी भिजावं म्हणून लस हे छत्रीचं काम करत आहे
मुंबईची परिस्थिती आज आकडा ८ हजाराच्या पुढे गेला आहे. महाराष्ट्रात रुग्णवाढ वेगाने होत आहे. विलगीकरण बेड २ लाख २० हजार आहेत. आता १ लाख ३७ ५६० भरले आहेत. ICU बेड २०५१९ आहेत, ४८टक्के भरलेत, ऑक्सिजन बेड ६२ टक्के आहेत २५ टक्के भरलेत, व्हेंटिलेटर ९५०० आहेत, ते सुद्धा भरत आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली तर या सुविधा अपुऱ्या पडतील.
या सुविधा आवश्यकतेनुसार वाढवले जातील, मात्र सुविधा वाढवणं म्हणजे बेड वाढले, ऑक्सिजन वाढले, व्हेटिलेटर वाढले पण डॉक्टर, नर्सेस कसे वाढणार, गेल्या वर्षीपासून हे राबत आहेत. यापैकी बऱ्याच जणांना कोव्हिडने गाठलं आहे. बरं झाल्यानंतरही थकवा वाटतो, शक्ती गेल्यासारखं वाटतं, डॉक्टर सांगतात निगेटिव्ह झाला आहात, पण आराम करा. मग डॉक्टर्स नर्सेस आजारी पडून पुन्हा बरं होऊन दोन तीन दिवसात कामावर रुजू होतात. ते थकलेत
“काहीही लपवत नाही आणि लपवणार नाही. महाराष्ट्रातील परिस्थितीत धक्कादायक जरी वाटत असली तरी जे सत्य आहे ते सांगत आहोत. इतर राज्यात वाढ नाही तुमच्याकडे का? या प्रश्नावर उत्तर देणार नाही. मला महाराष्ट्र प्यारा आहे. त्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे कुणी व्हिलन ठरवलं तरी माझी जबाबदारी पार पाडेल. पाडणारच ते माझं कर्तव्य. त्यामुळे घाबरु नका”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
“लॉकडाऊन करणार का याचं उत्तर मी अजून देणार नाही. पण सध्याच्या परिस्थिती विषयी मी माहिती देईल. जेव्हा कोरोनाचा महाराष्ट्रात शिरकाव झाला तेव्हा टेस्टिंगचे फक्त दोन लॅब होते. पण आज त्या दोनच्या पाचशे पर्यंत चाचण्या करणाऱ्या संस्था तयार केल्या आहेत. आपण मुंबईत सध्या दररोज 50 हजार चाचण्या करतोय. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात क्षमतेपक्षा जास्त चाचण्या करतोय. दररोज 1 लाख 80 हजार चाचण्या करतोय. याच चाचण्या अडीच लाखांवर करणार आहोत”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
राज्यात ७० टक्के RTPCR चाचण्या, राज्यातील स्थिती भीतीदायक असली तरी आपण सत्य समोर आणतोय.. इतर राज्यात निवडणुका असो किंवा काय तिकडे कोरोना नाही असं विचारलं जातं, पण मला त्या राज्यांचं पडलेलं नाही, मला महाराष्ट्र प्यारा आहे. आम्ही सत्यच सांगत राहू, मग मला व्हिलन ठरवलं तरी चालेल
“आजचा विषय कोरोना परिस्थिती काय? आपण काय करणार आहोत? हा आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर लॉकडाऊन लावावी लागेल की काय? अशी शक्यता मी वर्तवली होती. पण ही शक्यता अजूनही टळलेली नाही. गेल्या वर्षभरातील महाराष्ट्रातील प्रत्येक माता, भगीनीने आपुलकीने ऐकून घेतले आणि तसे तुम्ही सगळे वागले. यात सर्व धार्मिक नेते, सर्व राजकीय पक्ष त्यांचे कार्यकर्ते आले. मधल्या काळात आपण थोडे शिथिल झालो. आपण शस्त्र टाकले काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. लग्न समारंभ, राजकीय आंदोलने करण्यात आली”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
गेल्या मार्चपेक्षा यंदा कोरोना राक्षस मोठा, कोरोना नवनवी रुपात येत आहे. विषाणू नवी रुपं धारण करत आहे, ही भीती मी मागेही व्यक्त केली होती
“घाबरुन जाऊ नका. मी आपल्याला घाबरवण्यासाठी आलेलो नाही. तर आजची परिस्थिती काय, त्यावर मार्ग काढण्यासाठी मी आपल्याशी संवाद साधतोय. आपल्याला आता एक वर्ष झालं. आपण एका विचित्र विषाणूसोबत दिवस काढतोय. मार्च महिन्यातच कोव्हिडने महाराष्ट्रात शिरकाव केला. त्यानंतर राक्षसासारखा महाराष्ट्रावर हावी झाला. मधल्या काळात परिस्थिती नियंत्रणाल आली होती. आपण संयमी राहिल्याने परिस्थिती नियंत्रणात आली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशन गेल्या महिन्यात पार पडलं. लॉकडाऊन काळात जगाची आर्थिप परिस्थिती खराब झाली. तरीही अजित पवार यांनी संकटातही महाराष्ट्र पुढे नेणारा अर्थसंकल्प मांडला. महाराष्ट्रात राजकीय शिमग्याला सुरुवात झाली. पण मी त्याला आता उत्तर देणार नाही”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
घाबरुन जाऊ नका. मी आपल्याला घाबरवण्यासाठी आलेलो नाही. तर आजची परिस्थिती काय, त्यावर मार्ग काढण्यासाठी मी आपल्याशी संवाद साधतोय. आपल्याला आता एक वर्ष झालं. आपण एका विचित्र विषाणूसोबत दिवस काढतोय. मार्च महिन्यातच कोव्हिडने महाराष्ट्रात शिरकाव केला. त्यानंतर राक्षसासारखा महाराष्ट्रावर हावी झाला. मधल्या काळात परिस्थिती नियंत्रणाल आली होती. आपण संयमी राहिल्याने परिस्थिती नियंत्रणात आली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशन गेल्या महिन्यात पार पडलं. लॉकडाऊन काळात जगाची आर्थिप परिस्थिती खराब झाली. तरीही अजित पवार यांनी संकटातही महाराष्ट्र पुढे नेणारा अर्थसंकल्प मांडला.
मुंबईत आज 8 हजार 832 कोरोना रूग्ण, मुंबईत आज 20 जणांचा मृत्यू तर मुंबईत आज 5 हजार 352 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज, कोरोना रुग्णसंख्येने डोकेदुखी वाढली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात लाईव्ह, वाढत्या रुग्णसंख्येवर मुख्यमंत्री काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर राज्यातील सर्व विभागांचे मुख्य सचिव, कोविड १९ संसर्ग टास्क फोर्सचे (Task Force) वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यासोबत महत्वाची बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्रातील सद्यस्थिती, लॉकडाऊन, निर्बंध याबाबत मोठा निर्णय अपेक्षित आहे.
कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या ही चिंता वाढवणारी आहे. या अनुषंगाने संपूर्ण आढावा घेण्याचं काम सुरु आहे. बेड्स, मेडीसम, ऑक्सिजन याबाबत चर्चा सुरु आहे. कुठे काय उणिव आहे त्याबाबत व्यापक चर्चा झाली. ज्या ठिकाणी निर्बंध पाळले जात नाही तर अधिक निर्बंध करुन गर्दी कशी टाळली जाईल याबाबत चर्चा झाली. निर्बंधावर योग्य अंमलबजावणी होण्याची गरज आहे. याबाबत चर्चा करुन निर्णय होईल. अजून निर्णय घेण्यात आलेला नाही, असं राजेश टोपे म्हणाले होते
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यामध्ये निर्बंध लावण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. कोरोना संसर्गाच्या परिस्थितीवर टीव्ही 9 मराठीशी संवाद साधत असताना त्यांनी हे संकेत दिले. सक्रिय कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमध्ये देशात टॉप टेनमध्ये असलेल्या पुणे,मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड,अहमदनगर, या आठ जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागण्याची शक्यता आहे.