प्रफुल्ल पटेल तुम्ही लाचार झालात…; उद्धव ठाकरेंचा भरसभेतून निशाणा

| Updated on: May 14, 2024 | 8:48 PM

Uddhav Thackeray on Praful Patel in Vasai Sabha Loksabha Election 2024 : वसईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

प्रफुल्ल पटेल तुम्ही लाचार झालात...; उद्धव ठाकरेंचा भरसभेतून निशाणा
उद्धव ठाकरे
Follow us on

महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी आज मविआची जाहीर सभा झाली. वसईच्या वायएमसी मैदानात ही सभा झाली. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या सभेला उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर हल्लाबोल केला.प्रफुल्ल पटेल यांनी नरेंद्र मोदींना जिरेटोप घातली. यावरून विरोधक टीका करत आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्या कृतीचा ठाकरेंनीही निषेध केला. आज प्रफुल पटेलचा अर्ज भरायला नरेंद्र मोदी गेले. पटेल तुम्ही लाचार झालात… मोदींच्या चरणी लीन होताना महाराजाची टोपी ठेवतात…?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महायुतीवरही जोरदार टीका केली आहे.

⁠आज एक फोटो आला, प्रफुल पटेल यांना क्लीन चिट दिली. मुंबईत मोदींची सभा झाली तेव्हा मी भावूक झालो, असं म्हणाले. त्याच सभे मधते प्रफुल पटेल यांना कुछ लोग मिरची का व्यवहार करते है… असं ते म्हणाले, मग हे काय होतं?, असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केल आहे.

महायुतीवर निशाणा

देशभक्त माता, बांधवांनो…, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. हा लोकसभा निवडणुकीचा ⁠शेवटचा टप्पा आहे. ⁠कधी नव्हे ते महाराष्ट्रात उद्रेक आहे. ⁠किनाट्याही परिस्थिती इंडिया आघाडीचे सरकार आणणारच. पक्षातर करायला लावतात. पक्षात ये अन्यथा जेलमध्ये जा… असं सांगतात. आताच्या नेभळट लोकांना शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचे नाव घेण्याचा आधिकार नाही. ⁠मागच्या दहा वर्षात आम्ही सोबत होतो मोदी काही करतील. हे इंजिन लावतात अन् धापा टाकतात. आता देशातील इंजिन बदलायचे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.

भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर

काल याच ठिकाणी भाजपचे लोक आले होते. मला काही प्रश्न विचारुन गेले… अमित शाहा तुम्हाला काही अक्कल असेल तर मी तुमच्यासोबत येतो, बोलतो. ⁠मला म्हणाले उद्धव ठाकरे राम मंदिरात गेले नाही. ⁠पण मी काय त्या मुहुर्त काढून त्याठिकाणी जायला तुमचा अंधभक्त नाही. ⁠मी मुख्यमंत्री असताना जावून आलो, असं म्हणत भाजपच्या टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय.