मुंबई : राष्ट्रावादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईमध्ये आज अमृत महोत्सव सोहळा साजरा केला जात आहे. याच दरम्यान छगन भुजबळ यांना शुभेच्छा देत असतांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी खळबळ उडवून देणारे विधान केले आहे. याच दरम्यान अजित पवार यांनी भाषणा दरम्यान 1999 मध्ये आणखी चार महीने वेळ मिळाला असता तर राज्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या माध्यमातून सर्वाधिक जागा निवडून आल्या असत्या आणि छगन भुजबळ मुख्यमंत्री झाले असते असा जाहीर खुलासा केला आहे. तोच संदर्भ जोडत उद्धव ठाकरे यांनी भुजबळ यांना शुभेच्छा देत असतांना अजित दादा तुम्ही छगन भुजबळ हे मुख्यमंत्री कधी झाले हे सांगितले, पण मी सांगतो ते शिवसेनेत असते तर त्याआधीच मुख्यमंत्री झाले असते असे विधान केल्याने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाल्याचे पाहायला मिळाले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी छगन भुजबळ यांना शुभेच्छा देत असतांना भुजबळ यांचे तोंड भरून कौतुक केले आहे.
याशिवाय बाळासाहेब असतांना तुम्ही वाद मिटवून टाकला होता हे बरं केलं असे सांगत असताना त्यावेळी मा असायला हव्या होत्या अशी अपेक्षा बोलून दाखवली आहे.
भुजबळ आणि आम्ही एकाच व्यासपीठावर बसू असे कोणी तीन वर्षापूर्वी सांगितले असते तर विश्वास ठेवला नसता पण हे आज घडत आहे असेही ठाकरे यांनी कबूल केले आहे.
इतकंच काय तर छगन भुजबळ हे शिवसेना सोडून गेले पण सगळी राष्ट्रवादी शिवसेनेत घेऊन आले आणि सोबत कॉँग्रेसला देखील घेऊन आले असेही ठाकरे यांनी म्हंटलंय.
मात्र याचवेळी प्रफुल पटेल यांचे भाषण सुरू असतांना ठाकरेंनी मिश्किल टोला लगावला होता त्याची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.
ठाकरेंनी प्रफुल पटेल यांचे भाषण सुरू असतांना भुजबळ साहेबांच निवडणूक चिन्ह मशाल होते आणि आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे चिन्ह मशाल आहे असे म्हंटलं होते.
त्याचवेळी उद्धव ठाकरे मिश्किल टोला लावत माझ्या कडे परत पाठवा असे म्हंटले, मात्र याच दरम्यान पटेल यांनी आम्हला ते परवडणारे नाही, असं जर तुमच्या कडे माणसं पाठवायला लागलो तर बरीच माणस पाठवावी लागतील असे पटेल यांनी म्हंटलं आहे.
एकूणच छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठाकरे आणि भुजबळ हा वाद बाळासाहेब असतांनाच संपला असल्याचे एकप्रकारे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.