मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात उठाव केल्यानंतर शिवसेनेत पडझड सुरु झाली. ही पडझड रोखण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात शिवसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला प्रतिसाद मिळत होताच. परंतु, या शिवसंवाद यात्रेत सहभागी झालेल्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या भाषणातील टीका, टोल्यांनी विरोधकांची झोप उडाली होती. गुलाबराव पाटील, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आदींवर त्यांनी जिव्हारी टीका केली होती. शिवसंवाद यात्रेमुळे शिवसेनेमधील वातावरण बदलले होते.
शिवसंवाद यात्रेमुळे शिवसेनेत होणारी पडझड काही प्रमाणात थांबली असली तरी केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटामध्ये चलबिचल सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी या निर्णयानंतर महाराष्ट्र पिंजून काढण्याची घोषणा केली होती. तत्पूर्वी वातावरण निर्मिती करण्यासाठी आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय कसा अयोग्य आहे याचा भांडाफोड करण्यासाठी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने शिवगर्जना यात्रेचे आयोजन केले आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनचे निष्ठावान शिवसेना नेते, उपनेते, प्रवक्ते आणि युवासेनेचे पदाधिकारी राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. शनिवार २५ फेब्रुवारी २०२३ ही शिवगर्जना यात्रा सुरु होणार असून शुक्रवार ३ मार्च २०२३ ला संपणार आहे.
शिवसेना नेते सुभाष देसाई, खा. संजय राऊत, खा. अरविंद सावंत, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, शिवसेना उपनेते खा. प्रियांका चतुर्वेदी, खासदार राजन विचारे, खासदार संजय बंडू जाधव, खासदार ओमराजे निंबाळकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, उपनेत्या सुषमा अंधारे, ज्योती ठाकरे, संजना घाडी, अमोल कीर्तिकर, शुभांगी पाटील, युवासेना सचिव वरुण सरदेसाई आदी नेत्यावर विविध जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शिवसेना नेते सुभाष देसाई, उपनेत्या मीना कांबळी, विशाखा राऊत, माजी आमदार तुकाराम काते, तृष्णा विश्वासराव, युवासेनेचे राजोल पाटील
खा. राजन विचारे, माजी आमदार योगेश घोलप, राजाभाऊ वाजे, विभाग संघटक राजुल पटेल, युवासेनेच्या शितल देवरुखकर शेठ
माजी आमदार अनिल कदम, डॉ. जयप्रकाश मुंदडा, उपनेत्या किशोरी पेडणेकर, युवासेनेचे अंकित प्रभू
खा. संजय (बंडू) जाधव, उपनेते नितीन बानुगडे पाटील, उपनेत्या ज्योती ठाकरे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, युवासेनेचे प्रविण पाटकर
शिवसेना नेते अनंत गीते, उपनेत्या संजना घाडी, माजी आमदार विजय औटी, युवासेना सचिव वरुण सरदेसाई
शिवसेना नेते खा. अरविंद सावंत, उपनेते लक्ष्मण वडले, अमोल कीर्तिकर, माजी आमदार शिवाजी चोथे, युवासेनचे पवन जाधव
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार, युवासेनेचे हर्षल काकडे, शरद कोळी, दुर्गा शिंदे
खा. ओमराजे निंबाळकर, उपनेत्या सुषमा अंधारे, महिला आघाडी शुभांगी पाटील, माजी आमदार रामकृष्ण मडावी, प्रवक्ते अनिष गाढवे
उपनेते विनोद घोसाळकर, विजय कदम, माजी आमदार सुभाष वानखेडे, उल्हास पाटील, युवासेनेचे साईनाथ दुर्गे, कु. सुप्रदा फातर्फेकर
शिवसेना नेते खा. संजय राऊत, उपनेत्या खा. प्रियंका चतुर्वेदी, प्रवक्ते लक्ष्मण हाके, माजी आमदार बाबुराव माने, युवासेना विक्रांत जाधव