‘भाजपला राजकारणात पोरं होत नाही त्यात माझा काय दोष’, उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

| Updated on: Nov 11, 2024 | 9:21 PM

उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे, ते चाळीसगावमध्ये बोलत होते.

भाजपला राजकारणात पोरं होत नाही त्यात माझा काय दोष, उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
Follow us on

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा महायुती सरकार आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ते चाळीसगावमध्ये बोलत होते. मी म्हणजे भाजपा नाही, वापरा आणि फेकून द्या. 5 वर्षापूर्वी मला नाईलाईजानं मुख्यमंत्री व्हावं लागलं. मी कलाकार माणूस. फोटोग्राफी करतो. मी आज फोटोग्राफी केली. पहिल्या सभेला उतरलो हेलिकॉप्टरजवळच 5-6 जण उभे होतो.  मी त्यांना विचारलं तर म्हणाले तुमची बॅग चेक करायची आहे.  मी म्हणालो जरुर तपासा. जशी माझी बँग तपासली तशी पंतप्रधान मोदी, शहांची, शिंदेंची तपासणार का? जो कायदा मला आहे तोच भाजपच्या लोकांना आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान प्रचाराला आले तरी कायदा समान पाहिजे. तुम्ही जेव्हा शपथ घेता तेव्हा, भाजपचे नाही तर देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेता,  भाजपचे म्हणून असाल तर गुजरातच्या भाजप ऑफीसमध्येच बसा, माझी बॅग रोज तपासा किंवा बॅग तुम्हीच घेऊन चला. माझ्याप्रमाणेच मोदी, शहा, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची बॅग तपासली पाहिजे. ते येताना त्यांच्या बॅगा तपासाच मात्र जाताना देखील आवश्य तपासा. कारण महाराष्ट्र लुटला जात आहे. सिंचनाचे प्रकल्प अनेक वर्ष तेच आहेत,  भाजपचे खासदार त्रिफळाचित झाले आहेत.  इकडे निवडूण आले, आपण एकता दाखवली असती तर निवडूण आले नसते असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

यांच्या वडिलांचं काय जातं घराणेशाही म्हणायला, पण वारसा संभाळणं ही साधी गोष्ट नाही.
भाजपला राजकारणात पोरं होत नाही त्यात माझा काय दोष. ईडी इन्कम टॅक्स मागे लावता.  3 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बदलले,  चंद्रचुड तर उत्तम भाषणकार
ज्यांना भाषणकार पाहिजे त्यांनी घेऊन जा. आत्ताच्या नवीन न्यायाधीशांना माझी विनंती आहे,
लवकरात लवकर निर्णय घ्या, ज्यामुळे लोकशाही जिवंत राहील, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.