उद्धव ठाकरे यांची भूमिका, तर राणे यांची ती औकात… भाजप आमदाराचा खरमरीत टोला

| Updated on: Aug 09, 2023 | 5:52 PM

NDA च्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तोच आरोप पुन्हा केला. यावरून भाजप आमदाराने उध्दव ठाकरे यांना खरमरीत टोला लगावला आहे. शिवसेना आमदार यांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार हा विधानसभा अध्यक्ष यांचा आहे.

उद्धव ठाकरे यांची भूमिका, तर राणे यांची ती औकात... भाजप आमदाराचा खरमरीत टोला
PM NARENDRA MODI
Follow us on

मुंबई | 9 ऑगस्ट 2023 : राज्यात शिवसेना आणि भाजपा यांची 25 वर्षापासुन युती तोडण्याची घोषणा केली. ही युती भारतीय जनता पार्टीने नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्यामुळे तुटली असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी NDA च्या बैठकितही तेच बोलले आहेत. त्यामुळे आम्ही जे सांगत होतो त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. युती तोडण्यात उद्धव ठाकरे यांची भूमिका होती हे आता सिद्ध झालं असा टोला भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी लगावला.

शिवसेना आमदार यांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार हा विधानसभा अध्यक्ष यांचा आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निर्णय घ्यायचा असुन त्याची सुनावणी सुरु आहे, कायद्याला अभिप्रेत असेल असा निर्णय अध्यक्ष घेतील, असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मंत्रिपदाचा संबंध नाही

आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा अणि मंत्रिपदाचा काही संबंध नाही. अनेक विषयावर आंदोलने सुरु असतात. 100 काय 288 आमदारांना वाटत असेल की आपण मंत्री व्हावे पण कायद्यानुसार जेवढे आहेत तितकेच मंत्री करता येतात. यावर तीनही पक्ष बसून निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.

औकातचा मराठी अर्थ क्षमता

मंत्री नारायण राणे यांनी लोकसभेत खासदार अरविंद सामंत यांची औकात काढली. त्यावर भाष्य करताना ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांना जर कुणी बोलत असेल तर भाजपचा कोणताच नेता ते सहन करू शकत नाही. औकातचा मराठी अर्थ क्षमता आहे, नरेंद्र मोदी यांच्या बरोबरीच्या माणसाने टीका केले तर समजू शकतो, तुमची औकात लेव्हल नाही अशा अर्थाने राणे बोलले. पण, विरोधकांना कोणत्याही गोष्टीवरून आरोप करायचे आहेत.

उदयनराजे यांनी भूमिका बदलली का

उदयनराजे यांनी भूमिका बदलली असे वाटत नाही. कारण जो ज्या पक्षात असतो तसा वागत असतो. प्रत्येक पक्षाच्या आयडोलॉजीप्रमाणे वागत असतो. प्रत्येक नेत्याच्या क्लिप काढल्या तरी एकही नेता नाही असे सांगता येणार नाही. त्यांनी त्यावेळी पक्षांच्या धोरणानुसार भूमिका घेतली असेल पण आता ते आमच्याकडे आहेत म्हणून समर्थन करत आहेत, असे ते म्हणाले.

निधन कस झालं हा तपासाचा भाग

प्रा. हरी नरके यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील अभ्यासू साहित्यिक हरपला आहे. त्यामुळे साहित्य विश्वाचे नुकसान झाले आहे. त्यांचे साहित्यात योगदान मोठे आहे, पण, त्यांचे निधन कसे झाले हा तपासाचा भाग आहे, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.