मोठी बातमी! काल बॅगेची तपासणी, आज उद्धव ठाकरेंच्या विमानाला उड्डाणाची परवानगी नाकारली, समोर आलं मोठं कारण

| Updated on: Nov 12, 2024 | 4:16 PM

मोठी बातमी समोर येत आहे, उद्धव ठाकरे यांची बार्शीमध्ये नियोजीत प्रचार सभा आहे, मात्र त्यांच्या विमानाला लातूरमधून उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली आहे.

मोठी बातमी! काल बॅगेची तपासणी, आज उद्धव ठाकरेंच्या विमानाला उड्डाणाची परवानगी नाकारली, समोर आलं मोठं कारण
उद्धव ठाकरे
Follow us on

मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून सभांचा धडका सुरू आहे, आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र त्यांच्या विमानाला लातूरमधून उड्डाणास परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे लातूर विमानतळावर अडकून पडले असून, त्यांच्या विमानाचं टेक ऑफ रखडलं आहे. यामुळे शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे प्रचार सभांना विलंब होत असल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे.

परवानगी का नकाराली?

आज उद्धव ठाकरे हे सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत, मात्र त्यांच्या विमानाला लातूरमधून उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या विमानाचं टेक ऑफ रखडलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे सोलापूरकडे येणाऱ्या सर्व विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोणातून जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्रे मोदी यांचं विमान सोलापुरात लँड होणार नाही तोपर्यंत कोणत्याही विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात येणार नाहीये, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या विमानाच टेक ऑफ रखडलं आहे. दरम्यान यावरून आता शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे प्रचार सभेला विलंब होत असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

काल बॅगेची तपासणी

दरम्यान सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. उद्धव ठाकरे हेलीकॉप्टरमधून उतरताच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. यावरून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला. सर्वांना समान नियम पाहिजे, तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, एकनाथ शिंदे यांच्या बॅगेची तपासणी करणार का? असा सवाल त्यांनी यावेळी केला. तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या विमानाला लातूरमधून उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली आहे.