रत्नागिरी : मुंबई-सुरत-गुवाहटी-गोवा आणि पुन्हा मुंबई असा बंडखोर आमदार एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाने प्रवास करून राज्यात सत्तांतर घडवून आणले होते. त्यांच्या या निर्णयामुळे राज्यातील महाविकास आघाडीला पायउतार होऊन उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर राज्यात सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर हा वाद न्यायालयात गेल्यानंतर आणि निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्ष एकनाथ शिंदे गटाकडे गेल्यानंतर ठाकरे गटाची आणि उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीतील ही पहिलीच सभा होते आहे. त्यामुळे शिवसैनिकांसह अख्या राज्याचे लक्ष या सभेकडे लागून राहिले आहे.
या सभेविषयी बोलताना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सांगितले की, वरचे आमदार आणि खासदार कितीही गेले तरी,
खरी शिवसेना ही शिवसैनिकांवर कशी टिकून आहे ते या विराट सभेमुळे राज्यातील लोकांना समजणार आहे अशा शब्दात अनिल परब यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर शिवसेनेच्या बालेकिल्यात रत्नागिरीत ही पहिलीच सभा होते आहे. तर दुसरीकडे सत्तातंर झाल्यानंतर शिवगर्जना यात्रा जोरदार पणे सुरु आहे.
तर उद्धव ठाकरे यांची पहिल्यांदाच मुंबईबाहेर अशी ही रत्नागिरीत सभा होते आहे त्यामुळे या सभेला शिवसैनिकांची अफाट गर्दी असणार आहे आहे असा विश्वासही अनिल परब यांनी व्यक्त केला आहे.
आमदार अनिल परब यांनी बोलताना सांगितले की, खरी शिवसेना ही आमदार आणि खासदार यांच्यावर उभा राहिली नाही तर खरी शिवसेना ही येथील सामान्य शिवसैनिकांवर उभा आहे.त्यामुळे खासदार आणि आमदार गेले तरी आता जी शिवसेना महाराष्ट्रात दिसत आहे.
ती शिवसैनिकांच्या जीवावर दिसत आहे.त्यामुळे कितीही आमदार आणि कासदार गेले तरी उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच शिवसैनिक हे कायम असणारच आहेत असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
कोकण आणि शिवसेना यांचे नाते आतूट. त्यातच शिवसेनेवर स्थानिक नेत्यांचा प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीतील ही सभा होईत आणि त्या सभेतून जो आवाज येईल तो कोकणातून अख्या महाराष्ट्रात आवाज जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितले.
टीका करणाऱ्यांनी खुशाल टीका करावी. त्यांच्याकडे आम्ही लक्षच देत नाही त्यामुळे त्यांनी शिवसेना बोलताना विचार कराव कारण जे बंडखोर आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा आणि पोटनिवडणूक घ्यावी त्यावेळी खरी शिवसेना कळेल असंही त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच अनिल परब यांनी शिवसेनेविषयी बोलताना सांगितले की, आमचा पक्ष मजबूत आहे हेच सिद्ध होणार आहे. खरी शिवसेना कोणाची हे निवडणूक आयोगाने ठरवली असले तरी उद्या खरी शिवसेना कुणाची हे कळणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. जनतेच्या दरबारातच खऱ्या शिवसेनेची ताकद कळेल असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे.