मुंबई : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांना मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पहिलीच जाहीर सभा होणार आहे. 5 मार्चला उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांची कोकणात जाहीर सभा होणार आहे. सर्व शिवसैनिकांना सांगा ही सभा विराट झाली पाहिजे, त्यांचे डोळे पांढरे झाले पाहिजे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसनिकांशी मातोश्रीच्या बाहेर संवाद साधला आहे. कोकणातील खेड ( Konkan Khed ) येथे पाच मार्चला ही सभा होणार असून उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे मुंबईच्या बाहेर दौरा करत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे उद्धव ठाकरे हे सभा घेणार आहे. त्याच दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात इतर राजकीय पक्षांचे नेतेही प्रवेश करणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा महत्वाचा मानला जात आहे.
एकीकडे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतांना दुसरीकडे निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह यावर निर्णय दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे जाहीर सभा घेत आहे.
5 मार्च ला रत्नागिरी जिह्यातील खेडमध्ये होळी मैदान येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे काय बोलणार याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे.
शिवसेना नाव आणि पक्ष चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे राज्यभर दौरा करणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हाप्रमुख यांच्यासह महानगरप्रमुख यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
राज्यभरातून आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या सभेत येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यभर दौरा करण्याचा निर्णय घेत असतांना सुरुवात कोकणातून करण्यात आली आहे. त्याची तयारी शिवसैनिकांनी सुरू केली आहे.
शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर अनेक घडामोडी घडल्या आहेत. सर्वात महत्वाचे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. याशिवाय त्यानंतर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हही एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे.
एकूणच शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हातातून गेली आहे. याशिवाय येणाऱ्या निवडणुकीला समोर जायचे असतांना पक्षाची रणनीती काय असायला हवी याशिवाय जनतेत जाऊन काय आवाहन करायचे यावर ठाकरे भूमिका घेणार असल्याचे चित्र आहे.
उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेत कुणावर निशाणा साधला जातो. केंद्र सरकार सहित राज्यसरकारवर उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे कोकणातील जनतेचे लक्ष लागून आहे. त्यात शिवसैनिकांना सांगा विराट सभा झाली पाहिजे असेही मातोश्री बाहेरील संवादात उद्धव ठाकरे म्हणाले आहे.
याच दरम्यान मातोश्री बाहेर कोकणातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमलेले असतांना विराट सभा झाली पाहिजे त्यांचे डोळे पांढरे झाले पाहिजे असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपला टोला लागवला आहे.