संपूर्ण देशामध्ये असं वातावरण होतं की भाजपाविरुद्ध कोणी लढू शकत नाहीत, ते अजिंक्य आहेत. त्यांचा अजिंक्यपणा किती फोल आहे, ते महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलंय असं म्हणत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुका निकालांवर भाष्य करत सरकारला टोला लगावला. मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार. पृथ्वीराज चव्हाण, संजय राऊत, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेतेउपस्थित होते.
तसेच राज्यातील जनतेचेही त्यांनी आभार मानले. निर्भय आंदोलनापासून रवीश कुमार आणि युट्यूबर यांनी जनजागृती केली. ही लढाई लोकशाही वाचवण्याची होती. मविआला पाठिंबा देणाऱ्यांचा अभिमान. तुम्ही कौल दिला, देशाला जाग आली. ही लढाई अंतिम नाही. ही लढाई सुरू झाली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मोदी सरकार एनडीए सरकार झालं. हे सरकार किती दिवस चालेल हा संभ्रम आहे. आम्हाला नैसर्गिक- अनैसर्गिक युती म्हणत होते. आता कडबोळं झालं. ही युती नैसर्गिक की अनैसर्गिक हा संभ्रम आहे, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.
मोदींनी खोटा नरेटिव्ह सेट केला
मोदी म्हणतात त्यांचे बालपण मुस्लिम कुटुंबात गेलं. ईदमध्ये ताजिया खायचे. त्या खालेल्या मीठाला ते जागले की नाही. मोदींनी सांगावं त्या मिठाला जागले की नाही. व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये मीठ टाकतात. तेही जेवण ते जेवले की नाही ते सांगावं.
विरोधकांनी जनतेत चुकीचा संदेश दिला. एक नॅरेटिव्ह सेट केला म्हणून भाजपला फटका बसल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला होता. त्याला उद्धव ठाकरे यांनी थेट उत्तर दिलं. यांना (मविआ) मतं दिली तर तुमची संपत्ती घेतील, हे नरेटिव्ह खरं होतं का ? तुमची म्हैस चोरून नेतील. नळ कापून नेतील, मंगळसूत्र हे खरं नरेटिव्ह होतं का ? उद्योगधंदे वाढवेन, संतान हे खरं नरेटीव्ह होतं का? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.
भाजपला किती मतं मिळाली आणि किती लोकांनी भाजपच्या विरोधात मतदान केलं ही टक्केवारी बाहेर आली पाहिजे. त्यांच्याच लोकांनी सांगितलं संविधान बदलणार आहे. त्यांनीच हा नरेटिव्ह सेट केला होता. अच्छे दिनाच्या नरेटिव्हचं काय झालं. 15 लाखाचं काय झालं. 2014 पर्यंतच्या गोष्टी काढल्या तर खोटं नरेटिव्ह कुणी सेट केलं असं विचारत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला. मोदींनी सर्व चुकीची नरेटिव्ह मांडली असे सांगत त्यांनी निशाणा साधला.
मराठी माणूस झोपेतही भाजपला मतदान करणार नाही
आम्हाला मराठी मते का कमी मिळतील. असं काय कारण आहे. एम म्हणजे मराठी नाही. यावेळी लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मियांनी मतदान केलं. हिंदू मुस्लिम, शीख, ख्रिश्चन सर्वांनी दिलं. रक्त सांडवून मिळवलेली मुंबई लुटली जात असेल तर लुटारूंना मराठी माणूस मतदान करेल. मराठी माणूस झोपेतही भाजपला मतदान करणार नाही. वास्तवाची जाणीव भाजपला आली नसेल तर त्यांना निवडणुकीच्या वास्तवाला सामोरं जावे लागेल. आता प्रश्न त्यांच्याकडेही आहे. मी मुख्यमंत्री असताना वसली तीन गावं एक वसेची ना असं फडणवीस म्हणाले होते. आता हालत बेकार आहे. एकही गाव वसत नाही. तिन्हीचे तिन्ही ओसाड आहेत, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.