कोल्हापूरः राज्यात येणारे उद्योग व्यवसाय गुजरातला जात असल्याने गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाने शिंदे गटावर जोरदार निशाणा साधण्यात आला होता. महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातलाच का जात आहेत असा सवाल शिंदे गटाला गेल्या काही दिवसांपासून विचारला जात आहे. त्यावर आज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विकासाच्या मुद्यावरून शिंदे गटाला लक्ष्य केले होते. त्याविषयी ज्योतिरादित्य शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले की, काही काम न करता बडबडणे हे उद्धव ठाकरे यांचं काम असल्याची सडकून टीका त्यांच्यावर करण्यात आली होती. महाराष्ट्रात येणारे उद्योग हे गुजरातला जात आहेत हा केवळ आरोप असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
राज्यात येणारे उद्योग गुजरातला जात आहेत अशी टीका ठाकरे गटासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्याला उत्तर देताना ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे ज्याप्रमाणे टीका करत आहेत ते फक्त आरोप करत आहेत.
त्यामध्ये काही तथ्य नाही असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर टीका करण्यापेक्षा कंपन्यांच्या जवळ जाऊन बसले असते तरी हे उद्योग राज्यात आले असते असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
केंद्रीय उड्डाण मंत्री असलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले की, गेल्या 8 वर्षात विमानतळाचा विस्तार आणि विमानांची संख्या प्रचंड वाढवण्यात आली आहे.
त्यामुळे नागरी विमान क्षेत्रात क्रांती झाली असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. नागरी विमान क्षेत्रात मोठी प्रगती झाली असून ही जगातले सगळ्यात मोठे विमानतळ दिल्लीचे होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला, आणि हीच नव्या भारताची सुरुवात असल्याचेही त्यांनी सांगितले.वि
मान वाहतुकीविषयी बोलताना ते म्हणाले की, उडाण 4.2 योजनेत लहान शहरांना कनेक्टिव्हिटी देणार असून त्याचा फायदा अनेक शहरांना होणार आहे.
यावेळी त्यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवरही सडकून टीका केली. राहुल गांधी यांनी पहिला काँग्रेस जोडो करावे मग भारत जोडोच्या मागे लागावे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला.
भविष्यातील राजकारणाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, कोल्हापुरात भाजपचे संघटन वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे आम्ही काम केले तर शिंदे गटालाही त्याचा फायदा होणार आहे. त्याबरोबरच आगामी निवडणुकीत उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय 2024 मध्येच होईल असंही त्यांनी यावेळी सांगितले.