सांगलीला अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

| Updated on: Mar 25, 2025 | 7:29 PM

राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट घोंगावत आहे. सांगलीच्या मिरज शहरासह परिसराला अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला.

सांगलीला अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट घोंगावत आहे. सांगलीच्या मिरज शहरासह परिसराला अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला. सांगली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी प्रचंड वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं  हजेरी लावली आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून, काही ठिकाणी झाडं देखील उन्मळून पडल्याचं पाहायला मिळत आहे.

मिरजला पावसानं झोडपलं  

सांगली जिल्ह्याच्या मिरज शहरासह  परिसराला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. प्रचंड वादळी वाऱ्यासह हा अवकाळी पाऊस झाला आहे. विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं मिरज शहर आणि ग्रामीण भागांमध्ये हजेरी लावली. पावसासोबतच जोरदार वादळ देखील होतं, त्यामुळे रस्त्याच्या कडेची छोटी-मोठी झाडे देखील उन्मळून पडली आहेत.

वीज पुरवठा खंडित 

सांगलीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे ग्रामीण भागांसह काही ठिकाणी शहरी भागांचा देखील वीजपुरवठा खंडित झाल्याचं पाहायला मिळालं.  वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी तर घरांवरची पत्रे देखील उडून गेले आहेत.

उष्णतेपासून दिलासा 

उन्हाळा सुरू झाला आहे, सूर्य चांगलाच तळपत आहे. प्रचंड उष्णता वाढली आहे. तापमानात देखील मोठी वाढ झाली आहे. मात्र अचानक पावसानं हजेरी लावल्यामुळे नागरिकांना काही काळ का होत नाही, उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. मात्र दुसरीकडे अचानक पडलेल्या या पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं असून, नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

शेतकऱ्यांचं नुकसान 

या अवकाळी पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना देखील बसला आहे. अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झाल्याची शक्यता आहे. उन्हाळी पिकांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान पुढील काही दिवस राज्यात अवकाळी पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. सांगलीमध्ये जोरदार पाऊस झाला, यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. जनजीवन विस्कळीत झालं. घरावरचे पत्रे उडाले.