Bus Accident Help News | मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) खरगोन आणि धार जिल्ह्यादरम्यान नर्मदा नदीमध्ये आज सकाळी राज्य परिवहन महामंडळाची (State Transport Bus) बस कोसळून अपघात झाला. इंदोरकडून अमळनेरकडे जाणारी ही बस थेट नर्मदा नदीत कोसळली. या अपघातातील जखमींवर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहे, तर मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत (Help) देण्याविषयीची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले आहेत. दरम्यान मध्यप्रदेश प्रशासन या प्रवाशांच्या मदतीसाठी धावले आहे. नदीपात्रातून बस क्रेनच्या सहायाने काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला असून प्रवाशांच्या नातेवाईकांशी (Relatives) संपर्क करणे सुरु आहे. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जात आहे. स्थानिक नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदतीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आवाहन जळगाव जिल्हाधिकाऱ्यांतर्फे करण्यात येत आहे. अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), मुख्यमंत्री (CM), उपमुख्यमंत्री (Deputy CM) यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
An ex-gratia of Rs. 2 lakh each from PMNRF would be given to the next of kin of those who lost their lives due to the bus tragedy in Dhar, Madhya Pradesh. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi
हे सुद्धा वाचा— PMO India (@PMOIndia) July 18, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बस अपघाताबाबत तीव्र दुःख व्यक्त केले. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु असून स्थानिक प्रशासन जखमींना आवश्यक त्या सेवा पुरवत असल्याचे ट्विट त्यांनी केले. दरम्यान पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून Prime Minister’s National Relief Fund (PMNRF) मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख तर अपघातातील जखमींना 50 हजारांच्या मदत जाहीर करण्यात आली आहे.
मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज एसटी महामंडळाची बस बुडून झालेल्या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत.
अपघाताबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून असून बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याशी देखील बोलून मध्यप्रदेश मधील खरगोन व धार जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनसंदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील सूचना केल्या असून बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. मृतदेह बाहेर काढून योग्य प्रक्रियेनंतर त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात देण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. मुख्यमंत्री स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत.
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या अपघातासंदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहिती देखील जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. या नियंत्रण कक्षाचा क्रमांक 0257223180 आणि 02572217193 असा आहे.
बस अपघातातील मृतकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रंद्धाजली दिली. तसेच बचाव कार्य आणि जखमींवरील उपचाराचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्र्यांनी धारचे जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून बचाव कार्याचा आढावा घेतला.
बस काढण्याचे काम सुरु झाले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सूचना दिल्या आहेत. तसेच खरगोनचे खासदार गजेंद्रसिंग पटेल यांच्याशी मी या अपघातानंतर बोललो आहे. अमळनेर येथून ही एक बचाव पथक रवाना झाले आहे. जखमींवर तातडीने उपचार, तसेच जे वाचले त्यांना घरी सोडण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे जळगावचे खासदार उन्मेश पाटील सांगितले.
अंमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना राज्य सरकारने तातडीने मदतीची घोषणी करण्याचे आवाहन केले आहे. विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांना सुद्धा या घटनेची माहिती दिलेली असून ते स्वतः घटनास्थळी जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.