अयोध्या, उत्तर प्रदेश | 04 जानेवारी 2024 : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामांबद्दल वक्तव्य केलं. त्या वक्तव्याचे पडसाद उमटत आहे. आव्हाडांच्या या वक्तव्यावर अयोध्येतून प्रतिक्रिया आली आहे. राम जन्मभूमीतील महंत आचार्य सत्येंद्र दास यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांचं विधान पूर्णपणे चुकीचं आहे. राम ज्यावेळी वनवासाला गेले होते. त्यावेळी त्यांनी कंदमुळे आणि फळ खाल्ली हेच शास्त्रामध्ये लिहिलं आहे. शास्त्रानुसार तेच प्रमाण आहे, असं आचार्य सत्तेंद्र दास यांनी म्हटलं आहे.
“राम हा शाकाहारी नव्हता, तर मांसाहारी होता. त्याने 14 वर्ष वनवास भोगला होता. मग ते शाकाहारी कसे असू शकतात?”, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या वक्तव्यावर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. भाजप आमदार राम कदम यांनीही जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे.
आपल्या घरी पूजा असेल तरी मांसाहार करणारा व्यक्ती मांसाहार करत नाही. मंदिरात जाताना माणसाने मांसाहार केला असेल तरी तो जाणं टाळतो. रामचंद्र मांसाहार करत असते तर त्यांना मांसाहार नैवेद्य दिला. त्यांच्या या वक्तव्याला कोणताही आधार नाही. वाल्मिकी रामायण, राम चरित्र मानस या कशातच असा उल्लेख नाही. ठराविक संप्रदायाने कसं खुश करता येईल याचं उत्तम उदाहरण ते देत आहेत, असं राम कदम म्हणालेत.
जितेंद्र आव्हाड यांना शिक्षा झाली पाहिजे. FIR दाखल झालाच पाहिजे. आव्हाड आस्तिक आहेत. आस्तिक असून रामचंद्रन नाराज करू नये. प्रमाण दाखवावं आणि दाखवणार नसतील तर माफी मागून स्वतःहून अटक व्हावं, असं राम कदम म्हणालेत.
सामनाचे पत्रकार, प्रवक्ते गप्प का? हा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारायचा आहे. ही साधी घटना नाही. भव्य दिव्य मंदिर उभा राहत असताना शरद पवार कंपनी, राहुल गांधी कंपनी, उद्धव ठाकरे का नाराज आहेत?, असा थेट सवाल राम कदम यांनी केला आहे.