सिंधुदुर्ग : भाजप नेते नितेश राणे यांच्या जन्माच्या अगोदरपासून शिवसेनेचे हिंदुत्व आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेच्या हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांची तेवढी कुवतदेखील नाही, असा शाब्दिक हल्ला शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी भाजप नेते नितेश राणे यांच्यावर केला. ते सिंधुदूर्गमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरदेखील भाष्य केलं.
राणे आणि ठाकरे कुटुंबीयांमधील राजकीय वैर सर्वश्रूत आहेत. राणे कुटुंबीयांकडून ठाकरे सरकार तसेच महाविकास आघाडीला नेहमीच लक्ष्य केलं जातं. आर्यन खान ड्रग्ज प्रकरण तसेच समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पाठीमागे उभं न राहता शिवसेना अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला पाठिंबा देते आहे, असा आरोप राणे यांनी केला होता. राणे यांच्या याच आरोपांना वैभव नाईक यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “नितेश राणेंच्या जन्माच्या आधीपासून शिवसेनेचे हिंदुत्व आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेच्या हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांची तेवढी कुवतदेखील नाही. शिवसेनेने गेली 60 वर्षे हिंदुत्व जपलेलं आहे. आणि यापुढच्या काळातदेखील शिवसेना हिंदुत्व जपेल, असं रोखठोक प्रत्युत्तर नाईक यांनी राणे यांना दिलं.
आर्यन खानला अटक प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या समीर वानखेडे यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवरदेखील नितेश राणे यांनी बोट ठेवले आहे. त्यांनी समीर वानखेडे यांना पाठिंबा दिलाय. मलिक हे पाकिस्तानचे एजंट आहेत. पाकिस्तानचे जे ड्रग्ज माफिया आहेत. नवाब मलिक त्यांचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. जावयाला अटक केली म्हणून ते एनसीबीवर टीका करत आहेत. काम करणाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होत आहे; हे त्यांना कळत नाही, अशी टीका नितेश राणे यांनी 23 ऑक्टोबर रोजी केली होती.
दरम्यान, क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खानला शेवटी जामीन मंजूर करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. एनसीबी आणि आर्यन खान यांची बाजू ऐकूण घेतल्यानंतर कोर्टाने हा निकाल दिला आहे. कोर्टाने आदेशपत्र जारी जारी केलेलं नाही. मात्र आर्यन तसेच अरबाज मर्चंट, मूनमून धमेचा यांनांदेखील जामीन मंजूर करण्यात आलाय.
इतर बातम्या :
वानखेडेंविरोधातील बदनामीसत्र चीड आणणारं, अंजली दमानिया यांचा समीर वानखेडे यांना पाठिंबा
Gold Silver Rate Today : सोने पुन्हा एकदा महागले, चांदीचा भाव घसरला; पटापट तपासा ताजे दर
Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला 25 दिवसांनी जामीन, आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?
Aryan Khan Bail Granted: तीन दिवस कोर्टात युक्तिवाद, दावे आणि प्रतिदावे, कोर्टात नेमकं काय घडलं?; वाचा सविस्तरhttps://t.co/6RZxS4usyu#AryanKhanBail | #AryanKhanDrugsCase | #ShahRukhKhan | #BombayHighCourt
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 28, 2021
(vaibhav naik criticizes nitesh rane for sameer wankhede and aryan khan drugs case)