‘अकोला जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवा नाहीतर रस्त्यावर उतरु’, वंचित बहुजन आघाडीचा इशारा

| Updated on: Mar 04, 2021 | 4:22 PM

अकोल्यात सुरु असलेला लॉकडाऊन हटवण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

अकोला जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवा नाहीतर रस्त्यावर उतरु, वंचित बहुजन आघाडीचा इशारा
Nashik
Follow us on

अकोला : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारनं काही नियमावली जारी केली आहे. त्यानुसार स्थानिक पातळीवर अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अकोला जिल्ह्यातही जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. दरम्यान, या निर्णयाला वंजित बहुजन आघाडीनं विरोध केला आहे. अकोल्यात सुरु असलेला लॉकडाऊन हटवण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.(vanchit Bahujan aaghadi demands removal of lockdown in Akola city)

लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांची पिळवणूक होत आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे गुरुवारपासून लॉकडाऊनचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरेल, असा इशारा देण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते धैर्यवर्धन पुंडकर यांनी पत्रकार परिषदेत हा इशारा दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अकोला शहरासह मुर्तिजापूर आणि अकोटमध्ये गेल्या 10 दिवसांपासुन लॉकडाऊन सुरु आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी रुग्णालयातच उपचार घ्यावे- जिल्हाधिकारी

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव शहरी व ग्रामीण भागांत सातत्याने मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. योग्य उपचार न मिळल्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही . मधुमेह आणि उच्च रक्तदाब आजारी असलेल्या कोविडरुग्णानी 10 ते 12 दिवस घरी उपचार घेतले. त्यानंतर नामांकित खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांनी कोविडची लक्षणे दिसताच स्वतःहून कोविड चाचणी करून घ्यावी आणि ती पॉझिटिव्ह आल्यानंतर घरी उपचार न घेता
रुग्णालयात दाखल व्हावं,असं आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केलं आहे.

गेल्या 24 तासात 431 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. काल अजून 2 कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानं एकूण बळींची संख्या 374 वर पोहोचली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये 344 , तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये 87 अशा एकूण 421 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची जिल्ह्यातील संख्या 17,446 वर पोहोचली आहे.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाइन

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता बुधवारी आयोजित करण्यात आलेली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्यात आली. एकीकडे विधिमंडळाचे अधिवेशन ऑफलाईन सुरू असताना जिल्हा परिषदेला ऑनलाईनच बंधन का, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला आहे.

संबंधित बातम्या :

कोरोना संसर्ग वाढला, पुण्यात खासगी रुग्णालयात 50 टक्के बेड्स आरक्षित, अकोला जिल्ह्यात संचारबंदी

पुणे आणि नागपुरात कोरोना रुग्णसंख्येचा ब्लास्ट, लोकहो काळजी घ्या, नाहीतर…!

vanchit Bahujan aaghadi demands removal of lockdown in Akola city