मुंबई : वेदांता आणि फॉसकॉनच्या सेमी कंडक्ट (Vedanta-Foxconn Joint Venture) हा महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. महाराष्ट्रात मंजूर झालेला हा प्रकल्प गुजरातला( Gujarat) का गेला? प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी शिंदे सरकारला धारेवर धरले आहे. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच वेदांता ग्रुपचे(Vedanta Group Chairman) अध्यक्ष अनिल अग्रवाल( Anil Agarwal ) यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे.
हा प्रकल्प गुजरातला स्थापन करण्यासंदर्भात वेदांत-फॉक्सकॉन ग्रुप आणि गुजरात सरकारमध्ये करार झाला आहे. वेदांता आणि फॉसकॉनच्या सेमी कंडक्ट प्रकल्प गुजरातला हलवण्यावरुन महाराष्ट्रात राजकारण सुरु झाले आहे.
वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी हा प्रकल्प गुजरातला का गेला याचे स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कोणताही हस्तक्षेप नसून आमच्या टीमने सर्वेक्षण करुन हा निर्णय घेतला आहे.
प्रकल्पासाठी गुजरातमधून सर्व सहकार्य मिळाले. प्रकल्पासाठी गुजरातमधून अनेक सवलती मिळाल्या यामुळेच या प्रकल्पासाठी गुजरातची निवड करण्यात आल्याची माहिती अनिल अग्रवाल यांनी दिली.
कोणताही प्रकल्प यशस्वी करण्यासाठी जागेसह वीज आणि पाणी या दोन गोष्टीची आवश्यकता असते. गुजरातमध्ये या सुविधांसह अनेक सवलती मिळ्याचे अनिल अग्रवाल यांनी सांगीतले.
सेमिकंडक्टरची निर्मिती करणारा 1 लाख 58 हजार कोटींच्या गुंतवणुकीचा हा प्रकल्प पुण्यातल्या तळेगावात होणार होता. त्यासाठी जागाही देण्यात आली. पण आता वेदांता-फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प गुजरातच्या धोलेरा इथं गेला आहे.
हा प्रकल्प सुमारे पावणे दोन लाख कोटींचा होता. याच्याशी संबंधित 160 इंडस्ट्री राज्यात येणार होत्या. त्यातून 70 हजार रोजगार निर्मिती होणार होती.