नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसेंदिवस भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असताना सध्या भाजीपाला मार्केटमध्ये गाड्यांची आवक वाढली आहे. आज मार्केटमध्ये एकूण 596 गाड्यांची आवक झाली असून भाज्यांच्या दरात घसरण सुरूच आहे. (Vegetable Prices Decrease in Mumbai AMPC market)
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात भाज्यांच्या किंमती वाढल्या होत्या, मात्र आता बाजारात भाज्यांचे दर कोसळले असून कालपर्यंत 40 रुपये प्रतिकिलोने विकला जाणारा कोबी आज 10 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. सध्या बाजारात भेंडी 20 ते 30 रुपये, कोबी 10 ते 20 रुपये, मिरची 40 ते 50 रुपये, विकली जात असून टोमॅटो 20 ते 30, वांगी 35 ते 40 तर कोथिंबीर 10 ते 25 रुपये दराने विकली जात आहे.
मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये लॉकडाऊनमुळे 300 ते 400 वाहनांची आवक होत होती. पण गेल्या काही दिवसांपासून 500 ते 550 जवळपास गाड्यांची आवक असल्याने भाजीपाल्यांचे दर ढासळत आहेत.
फरसबी 30 ते 40 रुपये प्रतिकिलो
फ्लॉवर 10 ते 12 रुपये प्रतिकिलो
गवार 50 ते 60 रुपये प्रतिकिलो
गाजर 35 ते 40 रुपये प्रतिकिलो
भेंडी 20 ते 30 रुपये प्रतिकिलो
कोबी 10 ते 12 रुपये प्रतिकिलो
मिरची 40 ते 50 रुपये प्रतिकिलो
टोमॅटो 20 ते 30 रुपये प्रतिकिलो
काकडी 8 ते 15 रुपये प्रतिकिलो
वांगी 35 ते 40 रुपये प्रतिकिलो
कोथिंबीर 15 ते 25 रुपये प्रतिकिलो
(Vegetable Prices Decrease in Mumbai AMPC market)
संबंधित बातम्या
सर्वसामान्यांसाठी खुशखबर; मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांचे आवक वाढल्याने दरात स्थिरता