उस्मानाबाद : नावात काय आहे? या शेक्सपियरच्या विधानावर अनेक चर्चासत्र झडली असतील. अनेक विद्वान आणि अभ्यासकांनी त्याचा किस पाडला असेल. मात्र, माणूस किंवा कुठलीही वस्तू नावानेच तर ओळखली जाते, असं सर्वसामान्य बोलून जातात. मात्र, उस्मानाबादेत सध्या दोन नावांची चांगलीच चर्चा सुरु आहे आणि दुसरं म्हणजे एकाच घरात राष्ट्रपती आणि पंतप्रधान जन्माला आलेत! तुम्ही म्हणाल हा काय प्रकार? तर त्याचं झालं असं की, उस्मानाबाद जिल्ह्यातील चौधरी कुटुंबानं आपल्या मुलांची नावं थेट राष्ट्रपती आणि पंतप्रधान अशी ठेवली आहेत. ते ही पाळण्यात घालून, अगदी परंपरेनुसार! (Chaudhary couple from Osmanabad have named their children President and Prime Minister)
उस्मानाबादच्या उमरगा तालुक्यातील चिंचोली (भूयार) गावातील दत्ता आणि कविता चौधरी यांनी आपल्या बाळाचं “पंतप्रधान” असं नामकरण केलंय! इतकंच नाही तर त्यांच्या पहिल्या मुलाचं नावही ‘राष्ट्रपती’ असं आहे. त्यामुळे आता राष्ट्रपती आणि पंतप्रधान हे दोघे एकाच कुटुंबात वाढणार आहेत! ग्रामीण भागात बाळाचा नामकरण सोहळा मोठ्या थाटामाटात केला जातो. त्यासाठी खास पाळणा, आकर्षक सजावट केली जाते, पै-पाहुण्यांना निमंत्रण दिलं जातं. मग बाळाच्या कानात कुरररर करुन त्याचं नाव ठेवलं जातं. ही परंपरा जपत अगदी उत्साहात चौधरी कुटुंबाने आपल्या दोन्ही मुलांचा नामकरण सोहळा केलाय.
अलीकडच्या काळात राजकीय नेते मंडळी, चित्रपटातील अभिनेते-अभिनेत्री, फार तर देवादिकांची नावं आपल्या बाळाला दिली जातात. मात्र, देशाच्या सर्वोच्च पदाची नावंच आपल्या बाळाला देण्याचं काम दत्ता आणि कविता चौधरी यांनी केलं आहे. त्यामुळे ‘राष्ट्रपती’ आणि ‘पंतप्रधान’ हे दोघे भाऊ आता एकाच घरात बागडताना दिसणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे चौधरी कुटुंबाने आपल्या पहिला मुलाचं अर्थात ‘राष्ट्रपती’चं आधार कार्डही बनवून घेतलं आहे.
सध्या देशाच्या राजकारणात पदांसाठी होणारी रस्सीखेच तुम्ही-आम्ही पाहतच असतो. मात्र, इथे राष्ट्रपती आणि पंतप्रधान एकाच छताखाली गुण्यागोविंदाने राहणार आणि वाढणार आहेत. या दोन्ही बाळाचे वडील दत्ता चौधरीही फक्त मुलांचं नामकरण करुन मोकळे झाले नाहीत. तर त्यांना भविष्यात आपल्या मुलांना राष्ट्रपती आणि पंतप्रधान करायचं आहे.
नावात काय आहे? पण उस्मानाबादमधील दोन बाळांच्या नावातच सर्वकाही आहे! त्याचं कारण असं की दत्ता चौधरी आणि कविता चौधरी या दाम्पत्यानं आपल्या दोन बाळांची नावं थेत ‘राष्ट्रपती’ आणि ‘पंतप्रधान’ अशी ठेवली आहेत! @TV9Marathi @AdvYashomatiINC #President #PrimeaMinister #PantaPradhan pic.twitter.com/RuZ5W9SiaK
— sagar joshi (@spjoshi11) November 22, 2021
इतर बातम्या :
Pradnya Satav : विधान परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड
Chaudhary couple from Osmanabad have named their children President and Prime Minister