राज ठाकरे यांना दिल्लीत बोलावून फाईल… विजय वडेट्टीवार यांचा आरोप काय?

| Updated on: May 11, 2024 | 9:10 PM

जी ऑफर होती ती स्पष्ट होती. पराजय जवळ दिसल्याने पवार आणि उद्धव ठाकरेंना जवळ घ्यायचे हा त्याचा अर्थ आहे. त्यांनी राज्यात प्रचार केला. पण त्यांना त्यांचा पराभव दिसत आहे. त्यामुळेच अशा ऑफर येत आहेत. देशातील चित्र बदललेलं आहे आणि अशा परिस्थितीत या सगळ्यांना ऑफर देऊन गोंजारण्याचे काम सुरू झालेलं आहे. जो धिंगाणा यांनी घातला त्याला हे बळी पडणार नाहीत, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

राज ठाकरे यांना दिल्लीत बोलावून फाईल... विजय वडेट्टीवार यांचा आरोप काय?
raj thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. राज ठाकरे यांच्या या आवाहनावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज ठाकरेंच्या आवाहनाला किती लोक प्रतिसाद देतील? 2019 मध्ये मोदींना हुकूमशाह म्हणणारे राज ठाकरे आज त्यांच्यासाठी मते मागत आहेत. आता ते हुकूमशाह या देशातील लोकशाही टिकवणार आहेत काय?एवढा काय पुळका आला? असा सवाल करतानाच राज ठाकरे हे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या लाईनमध्ये फिट होते. त्यांना दिल्लीत बोलावून फाईल दाखवून सांगितलं की, आमचाच प्रचार करावा लागेल आणि म्हणून त्यांना त्यांचा प्रचार करावा लागत आहे, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

विजय वडेट्टीवार मीडियाशी संवाद साधत होते. राज ठाकरे यांनी अजित पवार यांची स्तुती केली होती. त्यावरही वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज ठाकरेंच्या तोंडात चमचाभर नाही तर मूठभर साखर घालायला पाहिजे. यापूर्वी राज ठाकरे यांनी अजित पवारांबाबत अश्लाघ्य भाषेमध्ये शब्दप्रयोग केलेला आहे, धरणाचा सूतोवाच करणारे कोण? ते राज ठाकरे आहेत. आता जो पुळका आलेला आहे तो 4 तारखेला दिसेल आणि त्यानंतर राज ठाकरेंची भूमिका बदललेली दिसेल, असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

याला गल्लोगल्लीचा प्रचार म्हणतात

वडेट्टीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवरही टीका केली. देशाचे पंतप्रधान गल्लोगल्ली फिरल्यासारखे फिरत आहेत. या प्रकाराला गल्लोगल्लीचा प्रचार म्हणतात. हे शोभनीय नाही. त्या प्रतिष्ठेला साजेसे आहे का? हा विचार जनता करायला लागली आहे, अशी टीका त्यांनी केली.

त्यांना का भटकंती करावी लागतेय?

दुसऱ्याचा आत्मा भटकतो म्हणणाऱ्यांना एवढी भटकंती का करावी लागत आहे? याचे उत्तर स्पष्ट आहे की त्यांचा पराजय निश्चित आहे. त्यामुळे त्यांना दुप्पट नाही तर तिप्पट सभा घेऊ द्या. तेवढ्या सभा मोदी अधिक देतील तेवढा पराजय मोठा होत जाईल असं सांगतानाच जुमलेबाजीला लोक वैतागले आहेत. शिवाय 10 वर्षात काही मिळाले नाही. ज्या पद्धतीने सरकार 10 वर्ष चालवले गेले, त्यावर जनता नाराज आहे, असंही ते म्हणाले.