नाशिक : नाशिकमधील भाजप पदाधिकारी विक्रम नागरे काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते. त्यांच्या घरावर काही खंडणी खोरांनी हल्ला केल्याचे समोर आले होते. त्यानंतर विक्रम नगारे यांनी खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार सातपुर पोलिस ठाण्यात दिली होती त्यावरून गुन्हा दाखल झाला होता. राज्यभर हा विषय चर्चेत आला होता त्याचे कारण म्हणजे विक्रम नागरे हे कामगार आघाडीचे प्रदेश चिटणीस पदावर होते. नुकताच त्यांनी भाजपच्या कामगार आघाडीच्या प्रदेश चिटणीस पदाचा आणि भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय त्यांच्या मातोश्री इंदुमती नागरे या नगरसेविका होत्या त्यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपला नाशिकसह कामगार आघाडीच्या दृष्टीने मोठा धक्का मानला जात आहे. अंतर्गत गटबाजीला कंटाळून नागरे यांनी राजीनामा दिल्याची नाशिकमध्ये चर्चा आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून मदत मिळत नसल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे.
नाशिकच्या पश्चिम मतदार संघातील लोकप्रतिनिधी आणि पक्षाकडून घरावर हल्ला झाला त्या प्रकारणात मदत न झाल्याने नागरे यांची नाराजी असल्याची चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वी नागरे यांच्या सातपुरच्या विश्वास नगर येथील निवास्थानावर काही टोळक्यांनी हल्ला केला होता, यावरून नागरे यांनी सातपुर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
खंडणी आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून विक्रम नागरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, याच दरम्यान त्यांना पक्षाने मदत केली नाही म्हणून ही नागरे यांची नाराजी असल्याची चर्चा आहे.
नागरे यांना पक्षाने शहरातील मुख्य पद दिले नाही म्हणून नागरे यांनी पक्ष सोडल्याचे देखील बोलले जात आहे, त्यामुळे विक्रम नागरे आणि त्याच्या मातोश्री इंदुमती नागरे ह्या शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.