रत्नागिरी : राज्यात सध्या हिंदुत्वाच्या (Hindutva) राजकारणावरून भाजप (Bjp) आणि शिवसेनेत (Shivsena) पुन्हा राजकारणचा कलगीतुरा पेटला आहे. आधी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्र्यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला, त्यानंतर भाजपकडून फडणवीसांनी मैदानात येत शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार पलटवार केला आणि सुरू झालं कुणाचं हिंदुत्व खरं? त्यानंतर आता शिवसेना खासदार विनायक राऊत यानीही भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेनी हिंदूत्वावर पुढाकार घेतला, हिंदुत्वावर निवडूक लढवण्याचे धाडस फक्त शिवसेनेने आणि बाळासाहेबांनी दाखवलं हे त्यांना विसरता येणार नाही. गर्व से कहो हम हिंदू हे सांगत पार्ल्यांची निवडणुक लढवली गेली. हिंदूत्वावर निवडणुक लढवावी लागेल हे केवळ आणि केवळ बाळासाहेबांनीच भाजपला सांगितलं होतं. त्यावेळी भाजपाची मंडळी घाबरत होती, पण त्यावेळी बाळासाहेबांनी हट्ट धरला म्हणुन भाजपवाले यशस्वी झाले असा खोचक टोला शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी भाजपला लगावला.
युती तोडायला भाजपच कारणीभूत
शिवसेना भाजप युती तोडायला कारणीभूत भाजपच जवाबदार आहे. ज्या पद्धतीने अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर दिलेला शब्द पाळला नाही, मुख्यमंत्री पदासाठी केवळ शिवसेनेशी भाजपने बेईमानी केली. म्हणूनच आज शिवसेनेला भाजपासून दूर जावं लागलं हे सत्य आहे. नवाब मिलकांच्या गोप्यस्फोटावर विनायक राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. काल नवाब मलिक यांनी बाळासाहेबांना युतीतून बाहेर पडायचे होते, असा गौप्यस्फोट केला होता. त्यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
संजय राऊत-पूनम महाजन ट्विटर वॉर
संजय राऊत यांच्या कार्टूनबाबत पुनम महाजन यांच्या ट्टिटला शिवसेनेकडून सणसणीत उत्तर दिलंय. अशी प्रतिक्रिाय विनायक राऊत यांनी संजय राऊत आणि पूनम महाजन यांच्या ट्विटर वॉरवर दिली आहे. काल संजय राऊतांनी एक कार्टून शेअर करत भाजपवर टीका केली होती, त्यावर ट्विट करत पूनम महाजन यांनी संजय राऊतांवर पलटवार केला होता. राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून अनेकदा भाजप आणि शिवसेना आमनेसामने आल्याचे दिसून आले आहे, मात्र आता हा वाद टोकाला पोहोचला आहे.