तुळजापुरात कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन, मास्क गायब! नवरात्रोत्सवाच्या तोंडावर प्रशासन सुस्त

| Updated on: Sep 24, 2021 | 11:31 PM

नवरात्रोत्सव जवळ आला तरी त्या अनुषंगाने उपाययोजना केलेल्या दिसून येत नाहीत. तसंच मंदिर प्रशासन, नगर परिषद, पोलीस प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर आगामी काळात तुळजापूरसह जिल्ह्यात कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा पोलीस अधीक्षक नीवा जैन यांनी दिलाय.

तुळजापुरात कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन, मास्क गायब! नवरात्रोत्सवाच्या तोंडावर प्रशासन सुस्त
तुळजाभवानी
Follow us on

उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशावेळी तुळजाभवानी मंदिर परिसरात कोरोना नियमाचे सर्रास उल्लंघन होताना पाहायला मिळत आहे. क्वचित एखाद्या व्यक्तीच्या तोंडावर मास्क दिसतो, तर सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा वाजले आहेत. येणारा भाविक, पुजारी आणि व्यापारी यापैकी बहुतांश लोक विना मास्क खुलेआम वावरताना दिसत आहेत. नवरात्रोत्सव जवळ आला तरी त्या अनुषंगाने उपाययोजना केलेल्या दिसून येत नाहीत. तसंच मंदिर प्रशासन, नगर परिषद, पोलीस प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर आगामी काळात तुळजापूरसह जिल्ह्यात कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा पोलीस अधीक्षक नीवा जैन यांनी दिलाय. (Violation of Corona rules in Tuljapur by traders, Devotees and Other people)

शारदीय नवरात्र महोत्सवास 29 सप्टेंबर रोजी मंचकी निद्रेने सुरुवात होणार आहे. या काळात देवीची मुर्ती शेजघरात निद्रेसाठी ठेवली जाते. 7 ऑक्टोंबर रोजी देवीच्या मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापनाकरून घटस्थापना होणार आहे. हा उत्सव 21 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. 29 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम परंपरेनुसार आयोजित करण्यात आले आहेत. या काळात तुळजापूर प्रवेश बंदी असणार आहे. तुळजापूर शहरात येणाऱ्या सर्व सीमा बंद करण्यात येणार आहेत. मंदिर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार आहे, असं पोलीस अधीक्षक निवा जैन यांनी सांगितलं.

कसा असेल तुळजाभवानीचा शारदीय नवरात्रोत्सव?

शारदीय नवरात्र महोत्सवास 29 सप्टेंबर रोजी मंचकी निद्रेने सुरुवात होणार आहे. या काळात देवीची मुर्ती शेजघरात निद्रेसाठी ठेवली जाते. 7 ऑक्टोंबर रोजी देवीच्या मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापनाकरून घटस्थापना होणार आहे. यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्याच्या सर्व सीमा नवरात्र काळात भाविकासाठी बंद केल्या जाणार आहेत.

>> 8 ऑक्टोबर – देवीची नित्‍योपचार पूजा व रात्री छबीना
>> 9 ऑक्टोबर – रथअलंकार महापूजा
>> 10 ऑक्टोब – ललित पंचमी असल्याने मुरली अलंकार महापूजा
>> 11 ऑक्टोबर – शेषशाही अलंकार महापूजा
>> 12 ऑक्टोबर – भवानी तलवार अलंकार महापूजा
>> 13 ऑक्टोबर – महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजाट
>> 14 ऑक्टोबर – घटोत्थापन
>> 15 ऑक्टोबर – विजयादशमी दसऱ्यानिमित्त पहाटे सिमोल्लंघन

त्यांनतर 19 ऑक्टोबर रोजी मंगळवारी कोजागिरी पोर्णिमानंतर श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने अन्नदान करण्यात येणार आहे. अशा प्रकारे शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता होईल, अशी माहिती महंत तुकोजी बुवा यांनी दिली.

घटस्थापनेपासून राज्यातील मंदिरे सुरु होणार

कोरोना प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आलेली राज्यातील मंदिरं सुरु करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणतात की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल. धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये.

इतर बातम्या :

PM Modi in US : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांच्यात दीड तास चर्चा, 5 महत्वाचे मुद्दे

जळगावच्या बोदवडमधील भाजपच्या 11 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, पण धक्का नेमका कुणाला?

Violation of Corona rules in Tuljapur by traders, Devotees and Other people