कैद्याला माणुसकीने वागवायचं नाही, असा जणू देशातला अलिखित नियम पण याला अपवाद ठरलंय वर्ध्याचं कारागृह ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. तब्बल 10 महिने सर्व वाहतूक ठप्प होती. याचा फटका कारागृहातील कैद्यांनाही बसला. कैद्यांना नातेवाइकांना भेटण्यास रोख लावण्यात आली. मात्र,शासनाने शासकीय खर्चातून कारागृह प्रशासनाला मोबाइल मंजूर केले आहेत.
कारागृहातील मोबाइलवरुन कारागृहातील बंदीवान आपल्या नातेवाइकांशी संवाद साधतात. एखाद्या कैद्याने नातेवाइकाशी भेटण्याची इच्छा दर्शविली असता त्याला व्हिडीओ कॉलिंगद्वारे नातेवाइकांना पाहण्याची संधी दिली जात आहे. एकंदरीत, कोरोनाकाळातही बंदिवानांना कारागृह प्रशासनाकडून मोठा आधार मिळत आहे.
ज्या बंदीला आपल्या नातेवाइकांशी बोलायचे आहे, त्या बंदीचे वकील ऑनलाइन अर्ज करून नातेवाइकाशी संवाद साधण्याची परवानगी घेत आहेत. एकंदरीत वर्धा जिल्हा कारागृहदेखील बंदिवानांची चांगली देखभाल करीत असून त्यांना लागणाऱ्या आवश्यक सुविधा पुरवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासन आणि कारागृह प्रशासनाने बंदिवानांना दिलासा दिला आहे.