वर्धा: जिल्ह्यातील भुगाव येथील उत्तम गालवा कंपनीत झालेल्या अपघातात 38 मजूर भाजले असल्याची माहिती समोर आली आहे. 38 जखमीपैकी 10 मजूर गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गंभीर भाजलेल्या मजुरांना नागपूरला उपचारासाठी पाठवलं जाण्याची शक्यता आहे. कंपनी प्रशासनाच्या मतानूसार कंपनीत विस्फोट झाला नसून हा अपघात आहे. या घटनेची कामगार अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणार आहे. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. (wardha uttam galawa company accident 38 labours injured 10 serious)
भुगाव येथील उत्तम गालवा मेंटालीक स्टील या कंपनीत ब्लास फर्निश या युनिटमध्ये सकाळच्या सुमारास अपघात घडलाय. या घटनेत 35 मजूर जखमी झाले असून त्यातील 10 मजूर गंभीर जखमी आहे. जखमींना सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गंभीर घटना घडूनही अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
आज (3 फेब्रुवारी) सकाळी पाचच्या दरम्यान दुरुस्ती करण्याकरता प्लांट बंद करण्यात आला होता.आठ वाजता या ठिकाणी काम चालू करण्यात आले. दरम्यान कंपनीच्या ब्लास फर्निश या युनिटमध्ये सकाळी दहा वाजताच्या सुमारास हा अपघात घडलाय. दरम्यान ट्यु एयरमधून गरम हवा आणि बारीक कण उडाले यामुळे मजूर भाजले गेले आहेत. या घटनेत 35 कामगार भाजून जखमी झाले आहे. त्यातील 28 जण सावंगी, 10 मजुरांना सेवाग्राम येथे पाठवण्यात आले आहे. 40 टक्क्यांपेक्षा जास्त भाजल्यामुळे 10 जण जास्त गंभीर जखमी आहेत. दोन ते तीन जणांना नागपूरला उपचाराला पाठवणार असल्याची माहिती उत्तम गालवा कंपनीचे जनसंपर्क अधिकारी आर. के .शर्मा यांनी सांगितलं आहे.
या प्रकरणी कामगार अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी दिली आहे. जिल्ह्याचे महसूल प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालं असून त्यांच्याकडून पंचनामा केला गेला आहे.
35 कामगार भाजल्याच्या या प्रकरणात जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी कामगार अधिकारी मार्फत चौकशी केली जाणार असल्याची माहिती दिलीय. मात्र, अद्यापपर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.सावंगी पोलिसांनी या प्रकरणाचा पंचनामा केलाय. मात्र, गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. घटने दरम्यान सेफ्टी ऑफिसर सुद्धा त्याठिकाणी उपस्थित असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे कामगारांमध्ये सध्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संबंधित बातम्या:
Wardha | वर्धातील उत्तम गालवा कंपनीत भीषण अपघात, 26 कामगार भाजले
वर्धाच्या बॅचलर रोड मार्गावर विचित्र अपघात
(wardha uttam galawa company accident 38 labours injured 10 serious)