वर्धा : आर्वी येथील गर्भपात प्रकरणात पोलिसांकडून सुरु असलेल्या तपासात दररोज नवनवीन बाबी समोर येत आहे. आज याच प्रकरणाच्या तपासदरम्यान पोलिसांनी कदम(Kadam) यांच्या घरातील सील केलेल्या खोलीला आज उघडत तपासणी केली. याचदरम्यान पोलिसांना एका कपाटात जुन्या लोखंडी पेटीत बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम(Cash) आढळून आली. दुपारी पोलिसांना ही रक्कम मिळाली असून रात्रीपर्यंत याचा मोजमाप सुरु होता. ही रक्कम तब्बल 97 लाख 42 हजार रुपये असल्याचं समोर आलंय. कदम यांच्या घरातील खोलीत आढळून आल्याने ही रक्कम आली कुठून, कुणाची आहे, याचा शोध पोलिसांसह आयकर विभाग घेणार असल्याची माहिती आहे. (97 lakh 42 thousand cash was found in the room of Kadam doctor’s house)
आर्वी येथील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेले. या प्रकरणात पोलिसांनी तपास करत एकूण सहा लोकांना अटक केली आहे. याच प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी कदम याचे रुग्णालयाच्या वर असलेल्या घरात पहिले तपासणी केली होती. मात्र त्यावेळेस डॉक्टर नीरज कदम यांच्या आई डॉ. शैलजा कदम यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने शैलजा कदम यांना नागपूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शैलजा यांच्यासोबत नीरज कदम यांचे वडील कुमारसीग कदम हे सुद्धा रुग्णालयात असल्याने एका खोलीला लॉक असून त्याच्या चाव्या या कुमारसिंग यांच्याकडे असल्याचे सांगण्यात आले होते. यामुळे पोलिसांनी ती खोली सील केली होती.
आज शनिवारी कदम कुटुंबियाकडून त्या खोलीची चावी पोलिसांना सुपूर्द केली असता पोलिसांनी खोली उघडून त्यात काही कागदपत्रं किंवा महत्वाचे पुरावे मिळतात काय, याची तपासणी केली असता खोलीत पाच ते सहा कपाटं दिसून आले. पोलिस कपाटं उघडून तपासणी करत असताना त्यात पोलिसांना एक लोखंडी पेटी आढळली त्यात जवळपास तीन बॅग मध्ये पोलिसांना रक्कम आढळली. रात्री उशिरापर्यंत मशिनच्या मदतीने पोलिसांनी रक्कम मोजली असून यात 97 लाख 42 हजार रुपये आढळले. (97 lakh 42 thousand cash was found in the room of Kadam doctor’s house)
इतर बातम्या
अंधेरीत महिला वकिलासोबत ATMमध्ये घडला बाका प्रसंग! आधी त्यानं मागून डोक्याचा मुका घेतला, मग…