वर्धा : अयोध्येला राममंदिराचे निर्माण होत आहे. वर्धेत सव्वाकिलो चांदीतून अयोध्या येथील निर्माणाधीन राममंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
वर्धेतील मनोहर तुकाराम ढोमणे ज्वेलर्सने दिल्लीहून ही प्रतिकृती तयार केली. श्रीराम नवमीनिमित्त वर्धेच्या गोल बाजार येथील श्रीराम मंदिरात दोन दिवस भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
एमटीडी ज्वेलर्सचे सौरभ ढोमणे म्हणाले, मागील महिनाभरापासून या राममंदिराचे काम सुरू आहे. अयोध्येतील राममंदिरासारखी प्रतिकृती तयार केली.
प्रतिकृती तयार करण्यास सात ते आठ कारागिरांना एक महिन्याचा कालावधी लागला. चांदीच्या प्रतिकृतीत आकर्षक कोरीव काम करण्यात आले आहे.
अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती तयार करण्याची संकल्पना होती. ती साकार झाल्याने अत्यानंद होत आहे. बनणारं मंदिर कसं बनते याची लोकांना माहिती होईल, असं सौरभ ढोमणे यांनी सांगितलं.