Wardha Crime | शासकीय जमिनीवर अतिक्रमण करत बांधकाम, शिक्षण महर्षी शंकरप्रसाद अग्निहोत्रीवर गुन्हा दाखल

| Updated on: Mar 28, 2022 | 5:00 AM

वर्धा येथील शंकरप्रसाद अग्निहोत्रीविरोधात खरांगणा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. शासकीय जागेवर अतिक्रमण करत अवैध बांधकाम केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी चौकशी केल्यास आणखी किती ठिकाणी जमिनीची अग्निहोत्री यांनी हडेलहप्पी केली. ही बाब उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Wardha Crime | शासकीय जमिनीवर अतिक्रमण करत बांधकाम, शिक्षण महर्षी शंकरप्रसाद अग्निहोत्रीवर गुन्हा दाखल
वर्धा येथील पाटबंधारे विभागाच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आलंय.
Follow us on

वर्धा : येथील शंकरप्रसाद अग्निहोत्री (Shankar Prasad Agnihotri). शैक्षणिक क्षेत्रात शिक्षण महर्षी म्हणूनही यांचं नाव मिरवलं जातं. आर्वी तालुक्यातील महाकाळी शिवारात महाकाळी सेवा मंडळाचे (Mahakali Seva Mandal) हे संचालक सुद्धा आहे. या ठिकाणी अग्निहोत्री यांनी पाटबंधारे विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करत अवैध बांधकाम केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. वर्धा जिल्ह्यातील धाम प्रकल्प परिसरात असलेल्या पाटबंधारे विभागाच्या (Irrigation Department) मालकीच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आलंय. वर्ध्यात शिक्षण सम्राट म्हणून ओळख असलेल्या शंकरप्रसाद अग्निहोत्री याने अतिक्रमण करत बांधकाम करण्याच्या उद्देशाने साहित्य आणून टाकले आहे.

सूचना देऊनही अतिक्रमण

पाटबंधारे विभागाची काचनूर आणि महाकाळी शिवारात शेत जमीन आहे. पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या शेत सर्व्हे क्रमांक 14 आणि 163 मध्ये अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम करत असल्याचं पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं. अनधिकृत बांधकाम करू नये, अशी सूचना अग्निहोत्री यांना देऊनही अतिक्रमण करून बांधकाम साहित्य आणत बांधकामला सुरवात करण्यात आली. त्यामुळं पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी महाकाळी सेवा मंडळाचे शंकरप्रसाद अग्निहोत्रीविरोधात गुन्हा नोंदवला. अशी माहिती खरांगणाचे पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांनी दिली.

थेट सरकारी जमिनीवर डोळा

पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुरवातीला शासकीय जागेवर अतिक्रमण करू नये या संदर्भात पत्रव्यवहार करण्यात आले. मात्र या पत्रांना अग्निहोत्री यांनी केराची टोपली दाखवत शासकीय जागेवर अतिक्रमण केले. यामुळे शेवटी अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दिलीय. शासकीय जागेवर अतिक्रमण करत बांधकाम केल्याची पोलिसांत तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळाल्यावर नागरिकांकडून अग्निहोत्री यांच्या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या आहेत. एकीकडं प्रवचन, भाषण, मार्गदर्शन करताना नियमांचे दाखले द्यायचे. आणि दुसरीकडं आपण नियमांना डावलून थेट सरकारी जमिनीवर डोळा ठेवायचा. अशा चर्चा शंकरप्रसाद अग्निहोत्री बाबत नागरिकांमध्ये ऐकावयास मिळत आहे.

Wardha | नगरविकास मंत्र्यांनी केली महामार्गाची पाहणी, समृद्धी महामार्गावर चालविली electric car

Video | मला इथं White Houseमध्ये आल्यासारखं वाटतं, सिम्बॉयसिसमध्ये नितीन गडकरी असं का म्हणाले?

Bhandara MPSC | शेतकऱ्याचा पोरगा झाला RTO inspector, भंडाऱ्यातील मायबापाच्या डोळ्यात आले पाणी!