वर्धा : जिल्ह्याचा संततधार पावसाने चांगलाच कहर केला. नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. घरांचे, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुराच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी 19 जुलै रोजी हिंगणघाट शहरासह तालुक्यातील विविध गावांत भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्तांशी प्रत्यक्ष संवाद साधला. वर्धा जिल्ह्यात संततधार पाऊस आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नदीचे पाणी घरांत शिरल्याने तसेच काही गावांना पुराने वेढा दिला. अनेक कुटुंबांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 19 जुलै रोजी हिंगणघाट येथे भेट दिली. यावेळी खासदार रामदास तडस (Ramdas Tadas), आमदार समीर कुणावार (Sameer Kunawar), माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार (Prerna Deshbhartar), मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसीलदार सतीश मासाळ तसेच लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला महाकाली नगरी येथे भेट देत पाहणी केली. नुकसानग्रस्तांशी त्यांनी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. यावेळी नुकसानग्रस्तांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यापुढे समस्या मांडल्या. तसेच वणा नदीच्या तिरावर पूर पाहणी केली. उपमुख्यमंत्र्यांनी कान्होली येथेही भेट दिली. येथे आमदार रणजित कांबळे यांची उपस्थिती होती. उपमुख्यमंत्र्यांनी नागरिक, शेतकरी यांच्याशी संवाद साधत माहिती जाणून घेतली. जिल्ह्यातील शेडगाव येथे नाल्याला मोठ्या प्रमाणावर पूर येऊन शेत पिकाचे नुकसान झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट देवून नुकसानीची पाहणी केली. शेडगाव येथील नाल्याच्या पुराने खरडून गेलेल्या शेत पिकाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. हिंगणघाट येथील महाकाली नगर येथे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर लोकांच्या घरात पाणी शिरले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी करुन नुकसानग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या.
हिंगणघाट येथील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांची शहरातील जी.बी.एम.एम.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे निवास व भोजन व्यवस्था करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याठिकाणी भेट देऊन अतिवृष्टीग्रस्तांशी संवाद साधला. जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे वणा नदीला पूर येऊन शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेत पिकांचे नुकसान व अजूनही तुडूंब भरुन वाहत असलेल्या वणा नदीची पाहणी केली. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुबार पेरणीही खराब झाली आहे. लवकर पेरणी शक्य नसल्याचे सरपंचांनी सांगितले. शेतकर्यांना योग्य मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न राहील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पावसाने विश्रांती घेतल्याने पूर ओसरू लागला आहे. पुराने झालेल्या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाले आहेत.