वर्धा : पावसाच्या संततधारमुळे नदी नाल्याना पूर आला. पूर पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहे. अश्यातच काही अतिउत्साही युवक या पुराच्या पाण्यात पोहण्याकरिता उडी घेताना दिसत आहे. वर्धेच्या पवनार (Pawanar) येथील धाम नदीपात्रात सेलू (Selu) तालुक्याच्या झडशी येथील तीन युवक पूर पाहण्याकरिता आले. तिघांपैकी दोन मित्रांनी पाण्यात पोहण्याकरिता उडी घेतली. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे बुडू लागले. मात्र त्यापैकी एक युवक बाहेर निघाला मात्र एक हा पाण्यात अडकला. युवक अडकल्याच लक्षात येताच पोलिसांसह महसूल विभागाला याची माहिती देण्यात आलीय. प्रशासनाच्या (administration) वतीने पथक घटनास्थळी येत युवकाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सेवाग्रामचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मने यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेलू तालुक्याच्या झडशी येथील 19 वर्षीय अनुराग विनोद गडकरी हा आपल्या दोन मित्रांसोबत पवनार येथील धाम नदीच्या तिरावर फिरायला आला. दरम्यान या तिघांपैकी दोघांनी दुथडी भरून वाहत असलेल्या नदी पात्रात उडी घेतली. यात अनुराग हा पाण्याच्या प्रवाहात अडकला. युवक नदीत अडकला असल्याची माहिती मिळताच तहसीलदार रमेश कोळपे, सेवाग्रामचे ठाणेदार निलेश ब्राह्मने हे आपत्ती व्यवस्थापन पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पथकाने प्रयत्न करत युवकाला नदीपात्रातून बाहेर काढले. मात्र नदीमध्ये पाणी जास्त असल्याने युवकाच्या पोटात पाणी गेले. युवकाची प्रकृती अस्वस्थ दिसल्याने प्रशासनाने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
धरणाच्या पाण्याचे विसर्ग आणी पावसाच्या संततधारमुळे नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. प्रशासनाकडून पूर पाण्यासाठी आणि पर्यटनस्थळ असलेल्या ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र तरीही नागरिक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पर्यटन स्थळावर गर्दी करून अश्या काही नागरिकांच्या या बेजबाबदार वागत आहेत. यामुळे धोका होण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.
पवनारच्या नदी पात्रात युवक अडकल्याच लक्षात येताच महसूल आणी पोलीस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तहसीलदार रमेश कोळपे आणि सेवाग्रामचे ठाणेदार निलेश ब्राह्मने यांनी स्वतः नदीपात्रात उतरत बचावकारिता प्रयत्न सुरु केले. अश्यातच तहसीलदार रमेश कोळपे यांनी दोरला बांधून असलेला लाईफ सेविंग ट्यूबला नदीपात्रात फेकून युवकापर्यंत पोहचविला. तहसीलदार आणी ठाणेदार यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल सगळीकडे त्यांचे कौतुक केले जातं आहे. या रेस्क्यू ऑपेरेशनमध्ये प्रशासनाच्या मदतीला स्थानिक भोई समाजाच्या बांधवानीही सहकार्य केले.