वर्धा, गडचिरोलीत पावसाचे थैमान; दोन लहान मुलं पुरातून गेली वाहून; तर वीज वितरणाचाही कर्मचारी बुडाला

| Updated on: Jul 10, 2022 | 4:04 PM

पूर पाहण्यासाठी पुलगावमधीलच प्रणय जगताप (वय 14 वर्ष ) आणि आदित्य शिंदे (वय 15) हे दोघेही गेले होते. त्यावेळी हे दोन्ही चिमुकले पुराच्या पाण्यात सापडल्याने वाहून गेले. यापैकी प्रणय जगताप या मुलाचा मृतदेह सापडला असून आदित्य शिंदेच्या मृतदेहाचा शोध प्रशासनाकडून घेतल्या जात आहे.

वर्धा, गडचिरोलीत पावसाचे थैमान; दोन लहान मुलं पुरातून गेली वाहून; तर वीज वितरणाचाही कर्मचारी बुडाला
Follow us on

वर्धाः गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जोरदार पावासाने धुमाकूळ घातला आहे. शनिवारी मुसळधार आलेल्या पावसामुळे नदीनाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. वर्ध्यातील पुलगावमध्ये (Vardha Pulgaon) नाल्याला आलेला पूर पाहण्यासाठी गेलेले दोन चिमुकले पाण्यात बुडाले होते, ही घटना वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथे घडली असून बुडालेल्या दोघांपैकी एकाच मृतदेह (Two children drown) सापडला असून दुसऱ्याचा शोध सुरु आहे. पुलगाव येथील बरांडा परिसरातून वाहणाऱ्या नाल्याला शनिवारी संध्याकाळी मोठ्या प्रमाणात पूर आला होता.

बालकांचा बुडून मृत्यू

हा पूर पाहण्यासाठी पुलगावमधीलच प्रणय जगताप (वय 14 वर्ष ) आणि आदित्य शिंदे (वय 15) हे दोघेही गेले होते. त्यावेळी हे दोन्ही चिमुकले पुराच्या पाण्यात सापडल्याने वाहून गेले. यापैकी प्रणय जगताप या मुलाचा मृतदेह सापडला असून आदित्य शिंदेच्या मृतदेहाचा शोध प्रशासनाकडून घेतल्या जात आहे.

वीज वितरणाचा कर्मचारी गेला वाहून

तर पावसामुळे गडचिरोलीतही एक धक्कादायक घटना घडली आहे. गडचिरोली वीज वितरण कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञ पेरमिली पुरात वाहून गेला असल्याची दुर्दैवी घटना काल रात्री घडली आहे. काल पुरात वाहून गेलेल्या तंत्रज्ञ पेरमिली याचा मृतदेह आज पुरातून बाहेर काढण्यात आला. पुरामध्ये वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव जितेंद्र शामराव दोडके असून ते चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील मूळ रहिवासी आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे ते कार्यरत होते, भामरागडवरून अहेरी येत असताना ही घटना घडली.

प्रचंड नुकसान

वर्धा आणि गडचिरोलीत पावसामुळे नद्यानाल्यांना पूर आला आहे. पावसाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. वर्धा येथील पुलगामध्ये घडलेल्या दुर्घटनेतील एका चिमुकल्याचा मृतदेह अजून सापडला नाही. त्याचा शोध घेण्याचे काम सुरू असून पावसामुळे येथील लोकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.