अवकाशातून पडलेल्या वस्तू शास्त्रज्ञांनी घेतल्या ताब्यात, इस्रोचे शास्त्रज्ञ वर्धा जिल्ह्यात, तपासणीनंतर सत्य समोर येणार

| Updated on: Apr 09, 2022 | 10:20 PM

इस्रोचे शास्त्रज्ञ शाहजहान एन. आणि मयुरेश शेट्टी ही दोन शास्त्रज्ञांची चमू समुद्रपूर येथे 8 रोजी रात्री दाखल झाली. त्यांनी 2 सिलिंडरसारखी वस्तू तपासणीसाठी ताब्यात घेतली. तर शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास गिरड पोलीस ठाणे गाठून 2 गोळे ताब्यात घेतले. तर हिंगणघाट पोलिसांकडून अवकाशातून पडलेले धातुच्या रिंगचे पत्रे ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

अवकाशातून पडलेल्या वस्तू शास्त्रज्ञांनी घेतल्या ताब्यात, इस्रोचे शास्त्रज्ञ वर्धा जिल्ह्यात, तपासणीनंतर सत्य समोर येणार
अवकाशातून पडलेल्या वस्तू शास्त्रज्ञांनी घेतल्या ताब्यात
Image Credit source: TV9
Follow us on

वर्धा : अवकाशातून पडलेल्या वस्तू गोळा करण्यासाठी अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो (ISRO)चे शास्त्रज्ञ (Scientist) वर्धा जिल्ह्यात आले होते. 2 एप्रिल रोजी लाखो लोकांनी अवकाशात आगीचे लोळ उठताना बघितले होते. यातून वस्तू स्वरुपात समुद्रपूर तालुक्यातील दोन गावे आणि हिंगणघाट तालुक्यातील दोन गावांत धातूची रिंग आणि काही सिलिंडरसारखे दिसणारे गोळे सापडले होते. नागरिकांत दहशत पसरली असतानाच जिल्हा प्रशासनाच्या पत्रानंतर इस्रोचे पथक सहा दिवसानंतर जिल्ह्यात दाखल झाले आणि त्यांनी सदर वस्तू ताब्यात घेतल्या आहे. (ISRO scientists have seized all the objects that fell from space in Wardha district)

परिक्षण केल्यानंतर या वस्तूबाबत नेमका अहवाल येणार

अवकाशातून पडलेल्या काही वस्तू समुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर काही वस्तू गिरड तसेच हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये पडल्याचे समजले. पोलिसांनी अवकाशातून पडलेल्या वस्तू ताब्यात घेतल्या. इस्त्रोशी पत्रव्यवहार केला. इस्रोचे शास्त्रज्ञ शाहजहान एन. आणि मयुरेश शेट्टी ही दोन शास्त्रज्ञांची चमू समुद्रपूर येथे 8 रोजी रात्री दाखल झाली. त्यांनी 2 सिलिंडरसारखी वस्तू तपासणीसाठी ताब्यात घेतली. तर शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास गिरड पोलीस ठाणे गाठून 2 गोळे ताब्यात घेतले. तर हिंगणघाट पोलिसांकडून अवकाशातून पडलेले धातुच्या रिंगचे पत्रे ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दोन्ही शास्त्रज्ञांनी संपूर्ण वस्तूंची पाहणी केली. इस्रोच्या वाहनातून या सर्व वस्तू तपासणीसाठी नेल्या जाणार आहेत. त्याचे परिक्षण केल्यानंतर या वस्तूबाबत नेमका अहवाल येणार आहे.

सर्व वस्तू इस्रोच्या ताब्यात देण्यात आल्या

वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी अवकाशात आगीचे लोळ उठताना पाहिले. दुसऱ्या दिवशी समुद्रपूर तालुक्यातील वाघेडा आणि धामणगाव परिसरातील शेतात अवकाशातून पडलेल्या 2 सिलिंडरसारख्या वस्तू मिळून आल्या. तसेच गिरड पोलीस ठाण्याच्या हद्दीत धामणगाव गाठे परिसरात 2 सिलिंडरच्या आकाराचे गोळे आढळून आले. तसेच हिंगणघाट तालुक्यातील भोईपुरा आणि आजंती शिवारात धातुच्या रिंगचे काही तुकडे पडलेले आढळून आले. पोलिसांनी यासर्व वस्तू ताब्यात घेत इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या ताब्यात तपासणीसाठी दिल्या. (ISRO scientists have seized all the objects that fell from space in Wardha district)

इतर बातम्या

Gunratna Sadavarte : पवारांच्या निवासस्थानावर तुफान राडा, अॅड. गुणरत्न सदावर्तेंना 2 दिवसांची पोलीस कोठडी; जाणून घ्या सदावर्तेंच्या रिमांडमधील मुद्दे

Jalgaon Murder : जळगावमध्ये दगडाने ठेचून एकाची हत्या, गेल्या पंधरवड्यातील चौथी घटना