या डिजीटल गेमला एनसीईआरटीचा प्रथम पुरस्कार, जिल्हा परिषद शाळेतील सहावीच्या विद्यार्थ्याचे कौतुक

| Updated on: Apr 09, 2023 | 10:37 AM

सहावीत शिकणाऱ्या गौरव वडुले या विद्यार्थ्याने तयार केलेला डिजीटल गेम सर्वोत्कृष्ट ठरला. गौरवला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.

या डिजीटल गेमला एनसीईआरटीचा प्रथम पुरस्कार, जिल्हा परिषद शाळेतील सहावीच्या विद्यार्थ्याचे कौतुक
Follow us on

वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सास्ती येथील सहावीत शिकत असलेला विद्यार्थी गौरव वडुले. गौरवने डिजीटल गेम तयार करण्यासाठी स्क्रॅच प्रोग्रामिंग शिकून घेत संगणक उपलब्ध नसताना मोबाईलच्या मदतीने कीबोर्ड आणि माऊसचा वापर केला. गौरवला लहानपणापासूनच तंत्रज्ञानाची आवड आहे. गौरवने आपली आवड जोपासत शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनात कोडींग आणि स्क्रॅच प्रोग्रामिंग शिकून घेतले. प्लॅनेट कोड डॉट इन या वेबसाईटच्या मदतीने अथक परिश्रम करून गौरवने डिजीटल गेम तयार केला.

गौरवचा गेम ठरला सर्वोत्कृष्ट

गौरव वडूले याने तयार केलेल्या डिजीटल गेमला एनसीईआरटीचा प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. गौरवच्या सेव्ह द फॉरेस्ट फ्रॉम फायर या डिजीटल गेमला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालाय. या स्पर्धेत देशभरातून ७५ डिजीटल गेम सहभागी झाले होते.


जंगलाला आग लागल्यानंतर फवारणी

देशभरातून स्पर्धेत सहभागी डिजिटल गेममधून सास्ती जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता सहावीत शिकणाऱ्या गौरव वडुले या विद्यार्थ्याने तयार केलेला डिजीटल गेम सर्वोत्कृष्ट ठरला. गौरवने तयार केलेला डिजिटल गेम हा जंगलाला आग लागल्यानंतर जंगल वाचविण्यासाठी विमानातून पाण्याची फवारणी करणे आणि जंगल वाचविणे याबाबत जागरूकता निर्माण करतो.

हे सुद्धा वाचा

सध्याच्या युगात डिजीटल गेमची आवड लक्षात घेऊन देशभरातील विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती करण्यासाठी गौरवने हा गेम तयार केला आहे. एनसीईआरटी दिल्ली द्वारा देशभरातील विद्यार्थी आणि नागरिकांसाठी हा गेम उपलब्ध करून दिला जाणार आहे.

गौरवचा करण्यात आला गौरव

आयसीएसएसआरचे चेअरमन पद्मश्री डॉ. जे. के बजाज, एनसीईआरटीचे सहनिदेशक प्रो. श्रीधर श्रीवास्तव यांच्या हस्ते गौरव वडुले याला पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था एनसीईआरटी दिल्लीद्वारा आयोजित ऑल इंडिया चिल्ड्रेन्स एज्युकेशनल इ-कॉन्टेन्ट स्पर्धेत देशभरातून ७५ डिजीटल गेम सहभागी झाले होते.

त्यात सास्ती जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता सहावीत शिकणाऱ्या गौरव वडुले या विद्यार्थ्याने तयार केलेला डिजीटल गेम सर्वोत्कृष्ट ठरला. गौरवला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.