Wardha Accident : वर्ध्यात अनियंत्रित मालवाहू ट्रकची कारला जबर धडक, अपघातात सात जण गंभीर जखमी

| Updated on: May 08, 2022 | 12:50 AM

बुलडाणा जिल्ह्यातील नांदोरा येथील फिरके कुटुंबीय कारने गडचिरोली येथे सासऱ्याच्या अंत्यसंस्कारासाठी जात होते. दरम्यान शेडगाव आणि वाघाडी नदीजवळ चंद्रपुरकडून वर्ध्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू चालकाचे स्टेअरिंगवरुन नियंत्रण सुटल्याने वाहन अनियंत्रित होऊन कारवर जाऊन धडकले.

Wardha Accident : वर्ध्यात अनियंत्रित मालवाहू ट्रकची कारला जबर धडक, अपघातात सात जण गंभीर जखमी
वर्ध्यात अनियंत्रित मालवाहू ट्रकची कारला जबर धडक
Image Credit source: TV9
Follow us on

वर्धा : अनियंत्रित मालवाहू ट्रकने कारला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघाता (Accident)त सात जण गंभीर जखमी (Injured) झाल्याची घटना वर्ध्यात घडली आहे. सदर मालवाहू ट्रक चंद्रपूरकडून वर्ध्याकडे चालला होता. तर कार वर्ध्याकडून समुद्रपूरकडे चालली होती. जखमींमध्ये एक महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. हा अपघात वाघाडी नदीजवळ सायंकाळी झाला. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतला असता प्रकृती नाजूक असल्याने फिरके कुटुंबीयांना पुढील उपचारासाठी नागपूर तर मालवाहूतील जखमी दोघांना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले. अपघाताची नोंद समुद्रपूर पोलिसांनी घेतली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. (Seven people were seriously injured when a cargo truck hit a car in Wardha)

ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात

बुलडाणा जिल्ह्यातील नांदोरा येथील फिरके कुटुंबीय कारने गडचिरोली येथे सासऱ्याच्या अंत्यसंस्कारासाठी जात होते. दरम्यान शेडगाव आणि वाघाडी नदीजवळ चंद्रपुरकडून वर्ध्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू चालकाचे स्टेअरिंगवरुन नियंत्रण सुटल्याने वाहन अनियंत्रित होऊन कारवर जाऊन धडकले. या भीषण अपघातात कारमधील एक महिन्याच्या लहान बाळासह पाच जण जखमी झाले. तर ट्रकमधील दोन जण जखमी झाले. प्रवीण गजानन फिरके (32), सुभद्रा प्रवीण फिरके (25), शालिनी गजानन फिरके (55), संध्या प्रदीप नाकडे (55) आणि अवघ्या एक महिन्याचे बाळ हे जखमी झाले. तसेच मालवाहू ट्रकमधील राकेश राजू उईके (30), अमोल कुदमवार (27) हे दोघे गंभीर जखमी झाले. (Seven people were seriously injured when a cargo truck hit a car in Wardha)

हे सुद्धा वाचा