Video – Wardha accident | अपघातग्रस्त ट्रकमधील अंगुरांची पळवापळवी, ट्रकच्या अपघातात चालक ठार

| Updated on: Feb 13, 2022 | 4:40 PM

अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू झाल्यापासून अनभिज्ञ नागरिकांनी अंगुर नेण्यासाठी गर्दी केली. काही नागरिक थैलीत तर काही रुमालात अंगूर बांधून नेत होते.

Video - Wardha accident | अपघातग्रस्त ट्रकमधील अंगुरांची पळवापळवी, ट्रकच्या अपघातात चालक ठार
वर्धा येथील ट्रकचा अपघात झाल्यानंतर द्राक्षे पळविताना नागिरक.
Follow us on

वर्धा : अपघातग्रस्त ट्रकमधील अंगुरांचा (Grape) सडा रस्त्याच्या कडेला पडला. येथे रस्त्याच्या कडेला पडलेले तसच कॅरेटमधील अंगुर लोकांनी पळवले. अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू झाल्यापासून अनभिज्ञ नागरिकांनी अंगुर नेण्यासाठी गर्दी केली. काही नागरिक थैलीत तर काही रुमालात अंगूर बांधून नेत होते. रस्त्यावरून कारने जाणाऱ्या अनेकांनीही वाहन थांबवत अंगूरची पळवापळवी केलीय. ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव ट्रकने समोरुन येणाऱ्या ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात ट्रकचालकाचा (Truck driver) जागीच मृत्यू झाला. तर क्लिनर गंभीर जखमी झाला. हा अपघात पुलगाव (Pulgaon) येथून तेरा कि.मी अंतरावर असलेल्या केळापूर जवळ बारा रोजी शनिवारी रात्रीच्या सुमारास झाला. रवी भास्कर जाधव (वय 26) रा. मेहेकर, जि. बुलढाणा असे मृतकाचे नाव आहे. क्लिनर प्रकाश सुखदेव लष्कर हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ट्रकचा आकारच बदलला

मृतक रवी भास्कर जाधव हा ट्रकमध्ये अंगुर भरून नागपूरकडे भरधाव जात होता. दरम्यान समोरील वाहनाला ओव्हरटेक करीत असतानाच नागपूरकडून पुलगावकडे जाणाऱ्या ट्रकला जबर धडक दिली. या अपघातात रवी भास्कर जाधव याचा जागीच मृत्यू झाला. तर प्रकाश लष्कर हा गंभीर जखमी झाला. अपघात इतका भीषण होता की, ट्रकचा समोरील भाग पूर्णत: चक्काचूर होऊन त्याचा आकारच बदलला होता. रात्रीच्या काळोखात अपघात झाल्याने काही वेळापर्यंत दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. तसेच ज्या ट्रकला धडक दिली त्या ट्रकमधील चालक अमोल घुगरे रा. अहमदनगर आणि क्लिनर शेख गफ्फार शेख रहीम यांना किरकोळ मार लागला. त्यांच्या ट्रकचेही मोठे नुकसान झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पाहा व्हिडीओ

Video – Bhandara | चोराने मंदिराचे कुलूप तोडले, दानपेटीतील रक्कम लंपास केली, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Photo | यवतमाळात नीलगायीचा सहा तास धुडगूस, दोन जणांना केले जखमी, कळपापासून झाली होती वेगळी

पतीच्या निधनानंतर खचली, त्यात कर्करोगाने गाठले; भंडाऱ्यातील महिलेने उचलले आत्मघाती पाऊल