वर्धा : वर्धा (wardha) जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. मागच्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने नद्यांना पुन्हा पूर आला आहे. जुलै महिन्यात मुसळधार पाऊस ज्यावेळी झाला होता. त्यावेळी देखील परिस्थिती अधिक बिकट झाली होती. अनेक गावांचा संपर्क तुटला होता. तसेच मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पात्रात देखील वाढ झाली आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे नदी, नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातून पाणी देखील सोडण्यात आले आहे. धरणातून (Dam) मोठा विसर्ग सोडल्यापासून जिल्ह्यातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे गरजे असेल तरचं घरातून बाहेर पडा असा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
वर्धा जिल्ह्यात पावसाने चांगलाच कहर केला आहे. काही वेळेसाठी विश्रांती घेत पाऊस पुन्हा पडत असल्याने नदी, नाल्यांना पूर आला आहे. रात्रीपासून जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार तर कुठे पावसाची रिपरिप पाहावयास मिळत आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे अनेक नद्यांना पुर आला आहे. त्यामुळे जिल्ह्याचे अनेक मार्ग पाण्याखाली आल्याने वाहतुकीसाठी बंद आहे. सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून मदतीची मागणी केली जातं आहे. दुसऱ्यांदा पूर आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी सरकारी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. शेतीत नदीचे पाणी घुसल्याने पीक पुर्णपणे पाहून गेले आहे.
नदी, नाल्यांनापूर आल्याने कारंजा तालुक्यातील कारंजा माणिकवाडा रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तेथील सहा गावांचा संपर्क तुटला असून वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. आर्वी तालुक्यातील कासारखेड सावध, आर्वी कौढण्यपूर, आर्वी वर्धमनेरी हे मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. तर हिंगणघाट तालुक्यातील सिरसगाव कापसी आणी चानकी भगवा हे मार्ग बंद झाले आहे. जोपर्यंत पावसाचा जोर कमी होत नाही तोपर्यंत जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे मार्ग बंद ठेवण्यात येणार आहेत.