वाशिमः गेल्या काही दिवसांपासून राज्यातील ग्रामीण भागात भारनियमन सुरू आहे. त्यामुळे अनेकदा आठवड्यातील ठरावीक दिवशी काही वेळेसाठी वीज प्रवाह खंडित करण्यात येतो. पण नंतर तो पूर्ववतसुद्धा होतो. पण वाशिममधल्या नगर परिषदेच्या हद्दीतील स्टीट लाईटची चक्क 15 दिवसांपासून बत्ती गुल आहे. त्यामुळे तिथले स्थानिक प्रचंड संतापलेत.
वाशिम येथे गेल्या 15 दिवसांपासून प्रभागातील काही ठिकाणी लाईट बंद होते, वारंवार सूचना देऊनसुद्धा अधिकारी काम करत नाहीत. घटस्थापना असूनसुद्धा लाईटचे काम पूर्ण केले नव्हते, जर जनतेला अंधारात राहावं लागत असेल, तर अधिकाऱ्यांनासुद्धा लाईट खाली बसण्याचा अधिकार नाही, असं म्हणत भाजप नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. भाजप नगरसेवक अमित मानकर यांनी वाशिम नगर परिषदमधील अधिकाऱ्यांच्या ऑफिसमधील लाईटची तोडफोड केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
वाशिम नगर परिषदेला शहरातील अनेक प्रभागासाठी वारंवार स्ट्रीट लाईट लावण्याची मागणी करून संबंधित विभाग हे लाईट लावत नसल्याने भाजपचे नगरसेवक अमित मानकर यांनी नगरपालिकेच्या मनमानी कारभारा विरुद्ध आक्रमक भूमिका घेत वाशिम नगर परिषद कार्यालयातील विद्युत विभागामधील सर्व लाईट फोडून टाकली. जोपर्यंत शहरातील नागरिक अंधारात राहतील तोपर्यंत न.प. विभागातील मुजोर व कामचुकार कर्मचाऱ्यांना लाईट खाली बसू देणार नाही, असा इशाराही नगरसेवक अमित मानकर यांनी दिला. विशेष म्हणजे याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
वाशिम न.प.चे भाजप नगरसेवक अमित मानकर हे वारंवार वाशिम शहरातील प्रभागामध्ये मागील अनेक वर्षांपासून विद्युत पोलवर असलेले स्ट्रीट लाईट बंद पडलेले आहे, याची दुरुस्ती करून लाईट सुरू करण्यात यावे आणि ज्या ठिकाणी नवीन विद्युत पोल लावण्यात आले, तेथे स्ट्रीट लावण्यात यावी, अशी मागणी करत होते. मात्र वाशिम न. प. मनमानी कारभार सुरू असून, संबंधित विभागातील मुजोर, कामचुकार कर्मचारी हे नियमानुसार काम करीत नसून संतापलेले नगरसेवक यांनी नगर परिषदेच्या मनमानी कारभाराविरुद्ध आक्रमक भूमिका घेतलीय.
घटस्थापना दिवस असूनही शहरातील लाईट लागलेली नाही. आता जोपर्यंत शहरातील नागरिक अंधारात राहतील, तोपर्यंत एकही कर्मचाऱ्याला लाईट खाली बसू देणार नाही. तसेच दोन दिवसांत शहरातील बंद पडलेले आणि पोलवरील नसलेले लाईट लावले गेले नाही, तर पूर्ण वाशिम नगर परिषद कार्यालयाचा विद्युत पुरवठा बंद करेन, असा इशारा नगरसेवक अमित मानकर यांनी दिलाय.
संबंधित बातम्या
Washim Municipal Council lights in the ward were turned off, the BJP corporator found the lights in the MSEDCL office and broke them