वाशिम : एकनाथ शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्ग (Samrudhi Highway) करताना अॅडवान्स टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. सोलार एनर्जी जनरेट करतोय. या मार्गाची हवाई पाहणी केलीये. भिवंडीपासून सेलूबाजार पर्यंतचा रस्ता पाहिला. वाईल्ड लाईफसाठी (Wildlife) काळजी घेतलीय. वन्य जीवांसाठी जंगलाचा फिल यावा अशी व्यवस्था केलीय. वाईल्ड लाईफसाठी 125 कोटी रुपये खर्च केलेत. ज्यांना मोबदला दिला त्यांनी गाड्या, दुकाने, घरं घेतली. त्यावर समृद्धी लिहीलंय. मुंबई-नागपूर हे अंतर आधी 16 तासांचं होतं. ते अंतर आता 8 तासांवर येणार आहे. शिवमडका (Shivamadka) इथं औद्योगिक कंपन्या येऊ लागल्या आहेत. लॅंड पूलींगमध्ये त्यांना फायदा दिला जातोय. अप्रतिम इंटरचेंजचं काम झालंय. कोविडचं संकट असतानाही काम झालंय, याचं एक समाधान आहे. विशेष आनंद आहे की तेव्हाही मी मंत्री होतो. आताही आहे. प्रोटोकॉलप्रमाणे सगळ्यांना निमंत्रण असेल. नागपूर ते सेलूबाजार हा टप्पा पूर्ण होतोय, पहिला टप्पा आहे, हा खुला केला जातोय, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
समृद्धी महामार्गावर कार, जीप, व्हॅन किंवा हलकी मोटार वाहने यांच्यासाठी प्रतिकिलोमीटर 1.73 रुपये प्रमाणे टोल द्यावा लागेल. हलकी व्यावसायिक वाहने, हलकी मालवाहतुकीची वाहने किंवा मिनी बस यांना 2.79 रुपये खर्च येईल. बस अथवा ट्रक (दोन आसांची) यांच्यासाठी 5.85, तीन आसांची व्यावसायिक वाहने यांच्यासाठी 6.38 रुपये, अवजड बांधकाम यंत्रसामग्री (एचसीएम) किंवा अनेक आसांची वाहने (एमएव्ही-चार किंवा सहा आसांची) 9.18 तर अतिजड वाहनांसाठी (सात किंवा जास्त आसांच्या वाहनांसाठी 11.17 रुपये प्रतिकिलोमीटर टोल द्यावा लागेल.
समृद्धी महामार्गावर दुचाकी, तीन चाकी, सहा आसनी ऑटोरिक्षा, ट्रॅक्टर यांना मनाई राहणार आहे. तसेच या मार्गावर 26 प्रकारच्या व्यक्तींच्या वाहनांना टोलमधून सूट देण्यात आली आहे. यात देशातील महत्त्वाची पदे सोबत न्यायाधीश, राज्यपाल, उपराज्यपाल, केंद्रीय मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, विधानपरिषदेचे सभापती, लोकसभा-राज्यसभा खासदार, विधानसभा-विधानपरिषद सदस्य, राज्याचे मंत्री, राज्य दौऱ्यावरील परदेशी मान्यवर, लष्कराची वाहने, केंद्र आणि राज्य सशस्त्र सेना दलाच्या निमलष्करी दलासह आणि पोलिस विभागाची वाहने, पोस्ट विभागाची वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका-शववाहिका यांचा समावेश आहे.