वाशिम : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन (Organized) करण्यात आलंय. स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव राष्ट्रीय उत्सव झाला असून देशभर राष्ट्रभक्ती, देशभक्तीचा उत्साह शिगेला पोचलायं. वाशिम (Washim) जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण भागात शाळा, महाविद्यालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील आदर्श ग्राम वनोजा येथे साळुंकाबाई राऊत महाविद्यालय, श्री शिवाजी कानिटकर महाविद्यालय (College), जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्रीय शाळा आणि अंगणवाडी केंद्राच्या वतीने प्रभात फेरी, व तिरंगा सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी क्रांतिवीरांच्या वेशभूषा केल्या.
मालेगाव तालुक्यातील खंडाळा शिंदे येथे नेहरू युवा केंद्र आणि समाजप्रबोधन महाविद्यालय खंडाळा शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने गावात जनजागृती रॅली काढून ठिकठिकाणी पथनाट्य सादरीकरण केले. तसेच अमृत महोत्सवाच्या लोगोचे मानवी चित्र साकारून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. ग्रामीण भागात अगदी लहाण्यांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत प्रत्येकजण देशाच्या या राष्ट्रीय पर्वात उत्साहाने सहभागी होताना दिसत आहे.
हर घर तिरंगा अभियान मार्फत वाशिम जिल्हातील जवळपास सर्वच घरांवर राष्ट्रध्वज लावण्यात आलेत. तसेच जिल्हात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून देशभक्ती सांगितलीयं. अनेक गावांमधून तिरंगा सन्मान रॅलीचे आणि प्रभात फेरींचे आयोजन देखील करण्यात आयं. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त खास विद्युत रोषणाई करण्यात आलीयं.
देशभक्ती किंवा राष्ट्रवादाची व्याख्या गरीब किंवा श्रीमंतीच्या मापदंडात बसत नाही. देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा होत आहे. वाशिममधील रेल्वे उड्डाणपुलालगत असलेल्या भटक्यांच्या पालावरही भारतीय तिरंगा अभिमानाने फडकवण्यात आला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रगीत गाऊन त्यांनी भारतीय राष्ट्रीय ध्वजाला सलामी देत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभागी झाले.