भारत-चीन सीमेवर देशेसवा करताना वाशिम जिल्ह्याचा सुपुत्र शहीद; उद्या येणार जन्मगावी पार्थिव

| Updated on: Apr 18, 2023 | 6:29 PM

अमोल गोरे या जवानाचा भारत-चीन सीमेवर देशसेवा बजावत असताना ते शहीद झाले. ही घटना त्यांच्या गावी समजताच त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे. वाशिम जिल्ह्यातील जवान शहीद झाल्याने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सर्व क्षेत्रातून दुःख व्यक्त केले जात आहे.

भारत-चीन सीमेवर देशेसवा करताना वाशिम जिल्ह्याचा सुपुत्र शहीद; उद्या येणार जन्मगावी पार्थिव
Follow us on

वाशिम : भारतीय सैन्य दलात प्याराशूट कमांडो म्हणून कार्यरत असलेले वाशीम जिल्ह्यातील सोनखास येथील जवान अमोल गोरे हे भारत-चीन सीमेवर अरुणाचल प्रदेश येथे बचाव कार्य करीत असतांना शहीद झाले आहेत. उद्या 19 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता वाशिम जिल्ह्यातील सोनखास या त्यांच्या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. अमोल गोरे हे शहीद झाल्याचे समजताच गावार शोककळा पसरली आहे.  उद्या अमोल गोरे यांचे पार्थिव त्यांच्या जन्मगावी येणार असल्याने सध्या गाव अखंड दुःख सागरात बुडाले आहे.

शहीद जवान अमोल गोरे हे देशसेवेसाठी सैन्यदलात दाखल झाले होते व प्यारा कमांडो म्हणून ते कार्यरत होते. याआधी झालेल्या अनेक महत्वपूर्ण संरक्षण दलाच्या अभियानात त्यांनी सहभाग घेऊन देशसेवा केली होती. 24 एप्रिल रोजी ते सुट्टी घेऊन गावी येणार होते. मात्र त्याआधीच ही दुर्दैवी घटना घडली आहे.

अमोल यांना अवघा 4 वर्षाचा चिमुकला मुलगा असून त्यांच्या मागे पत्नी, आई-वडील, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे. अमोल सारख्या धाडसी व मनमिळावू जवानाच्या शहीद होण्याने वाशिम जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

सोनखास गावातील सुपूत्र अमोल गोरे हा 14 एप्रिल रोजी भारत-चीन सीमेवरील अरुणाचल प्रदेश या ठिकाणी युनिट 11 एसएफ प्यारा सैनिक पेट्रोलिंगमध्ये कर्तव्य बजावत होते.

त्यावेळी त्यांच्या सोबतचे दोन जवान सकाळी 4 वाजता पहाडीवरुन घसरल्यामुळे बर्फात दबले गेले होते. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान त्या दोन जवानांना वाचवण्यासाठी अमोलने सकाळी 4 वाजता बर्फामध्ये उडी घेतली. त्यावेळी त्या दोघांना वाचवण्यात त्यांना यश आले मात्र वाशिम जिल्ह्याचे सुपूत्र अमोल गोरे हा सैनिक शहीद झाल्याचे त्यानंतर सांगण्यात आले.