वाशिम : सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) आदेशानुसार कुठल्याही धार्मिक स्थळी पोलीस प्रशासनाची परवानगी घेतल्याशिवाय लाऊडस्पीकर किंवा भोंगे लावू नये. नियमानुसार परवानगी घेतल्यानंतर लाऊडस्पीकर लावावे असे परिपत्रक (Circular) वाशिम पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) बच्चन सिंह यांनी काढले आहे. विनापरवानगी लाऊडस्पीकर लावल्यास नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं पोलीस अधीक्षकांचं म्हणणय. वाशिम जिल्ह्यात संस्था, धार्मिक स्थळे, प्रासंगिक सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी लाउडस्पिकरचा वापर होतो. अशा ठिकाणी लाउडस्पिकर लावण्याकरिता वाशिम पोलीस दलाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि ध्वनिप्रदूषण (विनियमन व नियंत्रण) अधिनियम 2000 मधील तरतुदींच्या अधीन राहून अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्यांना लाउडस्पिकर लावण्याची परवानगी देण्यात येणार आहे. भोंग्यांच्या आवाजावर मर्यादा आहे. त्या मर्यादेचे पालन आवश्यक आहे. यासाठी वाशिम पोलीस अधीक्षकांनी परिपत्रक काढलं. या नियमांचं पालन आवश्यक असल्याचं ते म्हणाले.